मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /पुण्यात NCP नगरसेवकाच्या मुलाचा विवाहितेवर बलात्कार; जीवे मारण्याची धमकी देत केला अत्याचार

पुण्यात NCP नगरसेवकाच्या मुलाचा विवाहितेवर बलात्कार; जीवे मारण्याची धमकी देत केला अत्याचार

Rape in Pune: पुण्यातील मुंढवा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकाच्या मुलाने एका विवाहित महिलेवर बलात्कार (NCP Corporator's son raped married woman) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Rape in Pune: पुण्यातील मुंढवा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकाच्या मुलाने एका विवाहित महिलेवर बलात्कार (NCP Corporator's son raped married woman) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Rape in Pune: पुण्यातील मुंढवा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकाच्या मुलाने एका विवाहित महिलेवर बलात्कार (NCP Corporator's son raped married woman) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

पुणे, 29 डिसेंबर: पुण्यातील मुंढवा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकाच्या मुलाने एका विवाहित महिलेवर बलात्कार (NCP Corporator's son raped married woman) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपी तरुणाने पीडित महिलेच्या मुलाला आणि पतीला जीवे मारण्याची धमकी (threat to murder son and husband) देत, तिच्यावर वारंवार बलात्कार केला आहे. 17 डिसेंबर 2021 रोजी आरोपी नगरसेवक पुत्राने पुन्हा एकदा महिलेवर बलात्कार केला आहे. यावेळी पीडितेच्या पतीने हा प्रकार पाहिल्यानंतर घटनेला वाचा फुटली आहे. 32 वर्षीय पीडित महिलेनं मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

समीर बंडुतात्या गायकवाड (Sameer Bandutatya Gaikwad) असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव असून तो मुंढवा परिसरातील रहिवासी आहे. 32 वर्षीय फिर्यादी महिला देखील मुंढवा परिसरातील रहिवासी असून तिचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. आरोपी समीर हा अनेकदा भाजी घेण्यासाठी फिर्यादीच्या घरी येत असायचा. दीड वर्षांपूर्वी पीडित महिला घरी एकटी असताना, आरोपी समीर तिच्या घरी गेला होता. यावेळी पीडित महिला किचनमध्ये काम करत असताना आरोपीला तिला पाठीमागून पकडलं.

हेही वाचा-रंगीत स्वप्न दाखवून आयुष्य करायचे बेरंग; गरीब मुलींना परराज्यात घेऊन जायचे अन्..

यावेळी तिने विरोध केला असता, आरोपीनं मुलाला, पतीला जीवे मारण्याची आणि संपूर्ण खानदान संपवून टाकण्याची धमकी दिली आहे. यानंतर आरोपीनं जबरदस्ती करत पीडित महिलेवर बलात्कार केला. पीडित महिला घाबरल्यामुळे तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. यानंतर आरोपीनं अशाप्रकारे वारंवार पीडितेच लैंगिक शोषण केलं आहे. 17 डिसेंबर रोजी आरोपी पुन्हा एकदा पीडित महिलेसोबत जबरदस्ती करत होता. यावेळी फिर्यादीच्या पतीने आणि मुलाने हा प्रकार पाहिला. यावेळी समीर याने मुलाला आणि पतीला जीवे मारण्याची धमकी देऊन निघून गेला. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात समीर गायकवाड विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा-10 वर्षांचा संसार क्षणात मोडला; प्रेमात आंधळ्या झालेल्या महिलेनं पतीचा घेतला जीव

दुसरीकडे, राष्ट्रवादीचे नगरसेवक सुनील ऊर्फ बंडू जयवंतराव गायकवाड (Bandu Jayawantrao Gaikwad) यांनी आपल्या मुलाला ब्लॅकमेल करत त्याच्याकडे खंडणी (Blackmail and extortion)मागितल्याचा आरोप करत मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. घटनेच्या दिवशी मुलगा समीर भाजी आणण्यासाठी गेला असता, संबंधित महिलेनं समीरला घरात बोलावून चहा दिला. यानंतर समीर घराबाहेर येऊन संबंधित महिलेशी बोलत असताना, संबंधित महिलेच्या पतीने विनयभंग केल्याचा खोटा आरोप लावून गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. तसेच तीन लाखांची खंडणी मागितली असा आरोपी नगरसेवकांनी केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Pune, Rape