गडचिरोली, 29 डिसेंबर: महाराष्ट्रातील गडचिरोली आणि विदर्भातील काही मुलींना ग्लॅमरस दुनियेचं स्वप्न दाखवून त्यांना उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात घेऊन जात त्यांना भलतंच काम करायला भाग पाडल्याची घटना समोर आली आहे. नराधम आरोपी गरीब आणि वडिलधाऱ्या व्यक्तींचा आधार नसलेल्या मुलींना हेरून त्यांना आपल्या जाळ्यात अडकवत असायचे. त्यांना सिनेमात संधी मिळेल (lure of giving work in film), खूप पैसे मिळतील अशी स्वप्न दाखवत भुरळ पाडली जायची. त्यानंतर घरच्यांचा विश्वास संपादन करून त्यांना उत्तर प्रदेश किंवा मध्य प्रदेशात घेऊन जात, त्यांना अश्लील नृत्य करायला भाग पाडलं (forced to half nude dance) जायचं.
नराधम आरोपी सुरुवातीला पीडित मुलींच्या कुटुंबीयांच्या खात्यावर पैसेही पाठवायचे. त्यामुळे आपली मुलगी आनंदात असल्याचा गैरसमज कुटुंबीयांना व्हायचा. त्यानंतर आरोपी पीडित मुलींवर जबरदस्ती करत त्यांच्याकडून हवे ते काम करून घेत होते. आरमोरी शहराजवळील एका गावातील रहिवासी असणारी मुलगी अशीच उत्तर प्रदेशात अडकून पडली आहे. मुलीशी कसलाही संपर्क होत नसल्याने, तिचे कुटुंबीय हवालदिल झाले आहेत. नराधमांच्या तावडीतून लेकीची सुटका कशी करायची, यासाठी एक महिला हतबल झाली आहे.
हेही वाचा-मूल होत नसल्याने सुनेसोबत सासऱ्याचं विकृत कृत्य; माणुसकीला हादरवणारी घटना
लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित अल्पवयीन मुलगी चंद्रपूर जिल्ह्यातील एका व्यक्तीकडे नृत्य शिकायला जायची. यावेळी उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीने पीडितेची माहिती घेऊन तिच्या आईशी संपर्क केला. तुमची मुलगी खूप चांगली डान्सर आहे. तिला चित्रपटात काम मिळवून देतो. भरपूर पैसे मिळतील, अशी खोटी स्वप्न दाखवून आरोपीनं पीडितेच्या आईचा विश्वास संपादन केला. यानंतर तो पीडित मुलीला उत्तर प्रदेशात घेऊन गेला.
हेही वाचा-10 वर्षांचा संसार क्षणात मोडला; प्रेमात आंधळ्या झालेल्या महिलेनं पतीचा घेतला जीव
याठिकाणी आरोपीनं पीडित मुलीकडून तोकडे कपडे घालायला लावून 'डान्स हंगामा', 'छत्तीसगडी धमाका' अशा कार्यक्रमांत अश्लील डान्स करायला भाग पाडलं आहे. सुरुवातीचे काही दिवस आरोपीनं पीडित मुलीच्या आईच्या खात्यावर काही रक्कम देखील पाठवली आहे. पण आता आरोपीनं पीडितेचा आईशी होणारा संपर्क तोडला आहे. समाजात बदनामी होईल या भीतीने पीडित कुटुंबीय पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी देखील धजावत आहेत. याचाच फायदा आरोपींकडून उठवला जात आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चंद्रपुरातील एक अल्पवयीन मुलगी उत्तर प्रदेशात अडकून पडली आहे. तिला कसं शोधायचं हा प्रश्न पीडितेच्या आईला पडला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Gadchiroli