मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /पुण्यासाठी राज ठाकरेंचा नवा प्लॅन, पुढील 3 दिवस कार्यकर्त्यांपासून नेत्यांसाठी महत्त्वाची अपडेट!

पुण्यासाठी राज ठाकरेंचा नवा प्लॅन, पुढील 3 दिवस कार्यकर्त्यांपासून नेत्यांसाठी महत्त्वाची अपडेट!

आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे उद्यापासून तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर येत आहेत.

आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे उद्यापासून तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर येत आहेत.

आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे उद्यापासून तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर येत आहेत.

पुणे, 14 डिसेंबर : स्थानिका आणि महापालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackery) औरंगाबादच्या दौऱ्यानंतर  तीन दिवसीय पुणे दौऱ्यावर (pune) येणार आहे. हा दौरा 15 डिसेंबर ते 17 डिसेंबर दरम्यान होणार आहे.या दौऱ्यात राज ठाकरे हे पदाधिकाऱ्यांबरोबर वैयक्तिक पातळीवर संवाद साधून त्यांचे मत जाणून घेणार आहे.त्याच बरोबर येणाऱ्या निवडणुकीची रणनीती या दौऱ्यात ठरवण्यात येणार आहे.

राज ठाकरे हे उद्या बुधवारी पुण्यात येणार आहे.आणि सकाळी 9 ते 11 शिवाजी नगर मतदार संघ आणि त्यानंतर 12 ते 2 कोथरूड मतदार संघ 4:30 ते 5:50 वाजता खडकवासला मतदार संघ आणि संध्याकाळी 6 ते 7:30 वाजता हडपसर मतदार संघ अशी बैठक होणार आहे. तर 16 डिसेंबरला सकाळी 9 ते 11 वाजता कसबा मतदारसंघ 12 ते 2 पर्वती मतदारसंघ दुपारी 4 ते 5:30 वाजता कॅन्टोन्मेंट मतदार संघ आणि संध्याकाळी 6 ते 7:30 वाजता वडगावशेरी मतदार संघाची बैठक घेणार आहे.शुक्रवारी 17 डिसेंबर ला आजी माजी नगरसेवक यांची बैठक होणार आहे, अशी माहिती यावेळी मनसे नेते बाबू वागस्कर यांनी दिली.

Electric Car: EV खरेदी करण्याचा विचार करताय? मग ही बातमी वाचाच

खरंतर राज ठाकरे यांनी यापूर्वीच महिन्यातील तीन दिवस पुणे मनसेसाठी देण्याचं कबुल केलं होतं. सुरुवातीला त्यांनी ते वेळापत्रक पाळण्याचा प्रयत्न केला देखील पण मध्यंतरी राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याने गेल्या महिन्यातील पुणे दौरा राज ठाकरे यांना रद्द करावा लागला. गेल्या आठवड्यापासून मात्र, राज ठाकरे पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यासाठी मुंबईच्या बाहेर पडले आहेत.

दिल्ली विधानसभा आवारात आढळली ब्रिटिशकालीन फाशी देण्याची खोली

आधी नाशिकनंतर औरंगाबाद आणि उद्यापासून पुणे असा त्यांचा भरगच्च दौरा सुरू आहे. यावेळी त्यांच्या पुणे दौऱ्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे ते पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात बसून न राहता सहाही मतदारसंघात जाऊन तिथंच स्थानिक शाखा अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी यांच्यासोबत वन टू वन संवाद साधणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याचा आगामी पुणे मनपा निवडणुकीसाठी मनसेला निश्चितच मोठा फायदा होणार आहे. पक्ष कार्यकर्त्यांमध्येही नवचैतन्य संचारल्याचं मनसेचे नेते बाबु वागस्कर यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलंय.

First published:

Tags: MNS, Raj Thackery