मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /ज्ञानवापीप्रमाणे पुण्यातील या मंदिरांच्या जागीही आता मशिदी; मनसेचा खळबळजनक दावा

ज्ञानवापीप्रमाणे पुण्यातील या मंदिरांच्या जागीही आता मशिदी; मनसेचा खळबळजनक दावा

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

अजय शिंदे (Ajay Shinde) म्हणाले की या दोन मंदिरांच्या जागेवर दर्गे उभारण्यात आले आहेत. या दर्ग्यांच्या ठिकाणी असलेल्या मूळ मंदिरांच्या मुक्तीसाठी पुढच्या काळात लढा उभा केला जाईल.

पुणे 23 मे : सध्या देशभर ज्ञानवापी मशिदीच्या (Gyanvapi Mosque) व्हिडिओग्राफिक सर्व्हेचं (Video-graphic Survey) प्रकरण गाजत आहे. अशातच आता यादरम्यान पुण्यातील पुण्येश्‍वर आणि नारायणेश्‍वर मंदिरांच्या (Puneshwar Narayaneshwar Temple) जागी मशिदी बांधल्याचा दावा मनसे नेत्याने केला आहे. काशीतील ज्ञानव्यापी मशिदीप्रमाणे पुण्यातील या दोन मंदिरांच्या जागेवर छोटा शेख आणि बडा शेख यांच्या नावाने दर्गे उभारण्यात आले आहेत. असा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस अजय शिंदे यांनी केला आहे.

ज्ञानवापी मशिदीच्या मुद्द्यावर होणार देशव्यापी आंदोलन! आयबीचा गंभीर इशारा

अजय शिंदे म्हणाले की या दोन मंदिरांच्या जागेवर दर्गे उभारण्यात आले आहेत. या दर्ग्यांच्या ठिकाणी असलेल्या मूळ मंदिरांच्या मुक्तीसाठी पुढच्या काळात लढा उभा केला जाईल. पुढे ते म्हणाले की, पुण्येश्वरालाही मोठा इतिहास आहे. याचा इतिहास सांगताना ते म्हणाले, अल्लाउद्दीन खिलजीचा एक सरदार बडा अरब पुण्यावर चाल करुन आला त्यावेळी त्यानं हे भगवान शंकराचं मंदिर उद्धवस्त केलं. त्याने केवळ नाही तर पुण्येश्वर आणि नारायणेश्वर ही दोन मंदिरं उद्धवस्त केली.

पुढे त्यांनी या मंदिरांची नेमकी जागा सांगत म्हटलं, की एक मंदिर शनिवारवाड्याच्या बरोबर समोर आहे. तर दुसरं मंदिर लालमहालाच्या पलीकडील बाजूला कुंभार वेसजवळ आहे. तिथे आज छोटा शेख दर्गा आहे. या मशिदी मंदिर पाडून निर्माण केल्या गेल्या आहेत, असा दावा त्यांनी केला.

Gyanvapi Case : ज्ञानवापी प्रकरण जिल्हा कोर्टाकडे, 8 आठवड्यात निर्णय घ्या - सुप्रीम कोर्ट

दरम्यान ज्ञानवापी मशिद प्रकरणी जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरु होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने ज्ञानवापी मशिद प्रकरण जिल्हा न्यायालयाकडे हस्तांतरित केलं आहे. या पूर्ण प्रकरणावर नव्यानं सुनावणी केली जाणार आहे. आजपासून यावर जिल्हा न्यायालयात जिल्हा न्यायाधीश अजय कुमार विश्वेश यांच्यासमोर सुनावणी होईल.

First published:

Tags: Masjid, MNS, Pune, Temple