पुणे 08 ऑक्टोबर : रस्त्यावरुन जाताना वाहने अतिशय सावकाश चालवण्याचा आणि सतर्क राहण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो. मात्र, रस्त्यावर मृत्यू कसा, कधी आणि कुठून अंगावर येईल, हे कोणीही सांगू शकत नाही. पुणे नाशिक महामार्गावर एक अशीच घटना पाहायला मिळाली. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून हे दृश्य थरकाप उडवणारं आहे. मोठी दुर्घटना! नाशिकमध्ये खासगी बसने घेतला पेट; 10 जणांचा आगीत होरपळून मृत्यू, VIDEO पुणे नाशिक महामार्गावर चाकण आंबेठाण चौकात महामार्गालगत एक तरुण आपल्या दुचाकीसह उभा होता. मात्र, पाठीमागून मृत्यू येत असल्याची कल्पनाही त्याला नव्हती. दुचाकीवर उभा असलेल्या तरुणाला पिकअप मालवाहू गाडीने मागून येत जोरात धडक दिली. या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.
पुणे नाशिक महामार्गावर चाकण आंबेठाण चौकात महामार्गालगत एक तरुण आपल्या दुचाकीसह उभा होता. इतक्यात मागूल आलेल्या वाहनाने त्याला धडक दिली. यात त्याचा मृत्यू झाला pic.twitter.com/7ruLbIfOXL
— News18Lokmat (@News18lokmat) October 8, 2022
अंगावर काटा आणणार अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. चाकण आंबेठाण चौकालगत महामार्गाच्या बाजुला दुचाकीवर बसलेला तरुण मोबाईल पहात होता. इतक्यात पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या पिकअप गाडीने त्याला जोरदार धडक दिली. यामुळे दुचाकीवरील तरुण अगदी फुटबॉल उडावा असा उडून बाजूला पडला. या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. संतोष पाचरणे असं अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. दरम्यान नाशिकमधूनही अपघाताची एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात असलेल्या चौफुलीवर लक्झरी बस आणि टँकर यांच्यात शनिवारी पहाटे 5 वाजून 15 मिनिटाच्या सुमारास भीषण अपघातात झाला. या अपघातानंतर चिंतामणी ट्रॅव्हलच्या बसने पेट घेतला. या आगीत बसमधील जवळपास दहा प्रवासी जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर, ३४ जणांवर सध्या उपचार सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.