पुणे, 24 मे : दहशतवादी संघटना असलेल्या लष्कर-ए-तोयबासाठी (Lashkar e taiba) काम करणाऱ्या एका तरुणाला पुण्यातून (Pune) अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र एटीएसने ही कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव मोहम्मद जुनैद असं आहे. त्याला एटीएसच्या टीमने पुण्यातील दापोडी (Dapodi) येथून अटक केली आहे.
अटक करण्यात आलेला जुनैद बुलढाण्याचा
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अटक करण्यात आलेला मोहम्मद जुनैद हा बुलढाण्याचा असल्याचं वृत्त समोर आलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मोहम्मद हा लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या जम्मू-काश्मीर येथील दहशतवाद्यांच्या संपर्कात आला होता.
वाचा : श्रीनगरमध्ये पाच दहशतवाद्यांना अटक, 300 काडतुसेही जप्त
लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेसाठी काम करण्यासाठी त्याला पैसे मिळत होते. जम्मू काश्मीरमधून पैसे मिळाल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. त्याने 10 हजार रुपये घेतले होते. दिल्ली स्पेशल सेलने महाराष्ट्र एटीएसला जुनैद याच्यावर नजर ठेवण्यास सांगितले होते. त्यानंतर आठवडाभर चौकशी केल्यानंतर 10 हजार रुपये घेतल्याचं मोहम्मद जुनैद याने मान्य केलं आहे.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा ठावठिकाणा लागला
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा ठावठिकाणा लागला आहे. संयुक्त राष्ट्रानं घोषित केलेला दहशतवादी आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच वास्तव्य कुठे आहे याचा खुलासा झाला आहे. दाऊद इब्राहिमचा भाचा अलीशाह पारकरनं याबाबतचा खुलासा केला आहे. आलीशाह पारकरनं म्हटलं की, भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिम पाकिस्तानच्या कराचीमध्ये (Karachi, Pakistan) आहे आणि त्याचे कुटुंब सणासुदीच्या वेळी दाऊदच्या पत्नीच्या संपर्कात असते.
अंडरवर्ल्ड डॉनचा भाचा अलीशाह पारकरने अंमलबजावणी संचालनालयाला याबाबतचं जबाब दिला. त्यानं दिलेल्या जबाबात खुलासा केला की, दाऊद पाकिस्तानातील कराची येथे आहे आणि तो जन्माला येण्यापूर्वीच 1986 नंतर भारत सोडून गेला होता.
अलीशाह पारकरनं आपल्या जबाबात म्हटलं आहे की, दाऊद इब्राहिम हा माझा मामा आहे आणि तो 1986 पर्यंत डंबरवाला भवनच्या चौथ्या मजल्यावर राहत होता. दाऊद इब्राहिम पाकिस्तानातील कराची येथे असल्याचे मी विविध स्त्रोतांकडून आणि नातेवाईकांकडून ऐकले आहे. मला केवळ हे सांगायचे आहे की दाऊद इब्राहिम माझे मामा कराची, पाकिस्तान येथे आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.