नवी दिल्ली, 24 मे: एक मोठी बातमी समोर येतेय. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा (Underworld don Dawood Ibrahim) ठावठिकाणा लागला आहे. संयुक्त राष्ट्रानं घोषित केलेला दहशतवादी (UN-declared Terrorist) आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Underworld don Dawood Ibrahim) याचं वास्तव्य कुठे आहे याचा खुलासा झाला आहे. दाऊद इब्राहिमचा भाचा अलीशाह पारकरनं याबाबतचा खुलासा केला आहे. आलीशाह पारकरनं म्हटलं की, भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिम पाकिस्तानच्या कराचीमध्ये (Karachi, Pakistan) आहे आणि त्याचे कुटुंब सणासुदीच्या वेळी दाऊदच्या पत्नीच्या संपर्कात असते. अंडरवर्ल्ड डॉनचा भाचा अलीशाह पारकरने अंमलबजावणी संचालनालयाला याबाबतचं जबाब दिला. त्यानं दिलेल्या जबाबात खुलासा केला की, दाऊद पाकिस्तानातील कराची येथे आहे आणि तो जन्माला येण्यापूर्वीच 1986 नंतर भारत सोडून गेला होता. चमत्कार..! दफन केल्यानंतर तासाभरात नवजात मुलगी कबरीतून जिवंत बाहेर अलीशाह पारकरनं आपल्या जबाबात म्हटलं आहे की, दाऊद इब्राहिम हा माझा मामा आहे आणि तो 1986 पर्यंत डंबरवाला भवनच्या चौथ्या मजल्यावर राहत होता. दाऊद इब्राहिम पाकिस्तानातील कराची येथे असल्याचे मी विविध स्त्रोतांकडून आणि नातेवाईकांकडून ऐकले आहे. मला केवळ हे सांगायचे आहे की दाऊद इब्राहिम माझे मामा कराची, पाकिस्तान येथे आहेत. त्यांनी भारत सोडला तेव्हा माझा जन्मही झाला नव्हता आणि मी किंवा माझे कुटुंबीय त्यांच्या संपर्कात नाही. मला हे देखील नमूद करावेसे वाटते की कधीकधी ईद, दिवाळी आणि इतर सणांच्या निमित्ताने माझे मामा दाऊद इब्राहिमची पत्नी मेहजबीन दाऊद इब्राहिम माझी पत्नी आयशा आणि माझ्या बहिणींच्या संपर्कात असतात, असंही अलीशाहनं सांगितलं आहे. जबरदस्त..! 15 पिस्तूलसह पाच हायब्रिड दहशतवाद्यांना अटक, 300 काडतुसेही जप्त अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अलीशाह पारकरची अनेकदा चौकशी केली. याआधी फेब्रुवारीमध्ये दाऊद इब्राहिमच्या भाच्याची मुंबईतील एका राजकारण्याशी संबंध असलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशी करण्यात आली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.