मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Pune : लम्पी आजाराने घाबरू नका, 'या' पद्धतीने घ्या प्राण्यांची काळजी, पाहा VIDEO

Pune : लम्पी आजाराने घाबरू नका, 'या' पद्धतीने घ्या प्राण्यांची काळजी, पाहा VIDEO

लम्पी स्किन ( Lumpy skin ) आजाराचा सध्या जनावरांमध्ये प्रसार झपाट्याने होत आहे. त्यामुळे पशुधन पालक शेतकऱ्यांनी घाबरून न जाता पशुधनाची काळजी घ्यावी, असे महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त धनंजय बरकाळे यांनी केले आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 13 सप्टेंबर :  कोरोना आणि मंकीपॉक्सनंतर आणखी एक संसर्गजन्य आजार देशामध्ये सध्या झपाट्याने पसरतोय. देशामध्ये जनावरांमध्ये सध्या लम्पी स्किन आजाराचा प्रसार झपाट्याने होत आहे. यामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. महाराष्ट्रमध्येही लम्पी स्किन ( Lumpy skin ) ह्या आजाराचा झपाट्याने प्रसार होत आहे. याच पार्श्वभूमीवर लम्पी स्किन आजार नियंत्रणासाठी राज्यातील पशुसंवर्धन विभागासह ( animal department) इतर यंत्रणा सज्ज झाली आहे.

राज्यातील 20 जिल्ह्यांमध्ये 2346 जनावरांना लम्पी स्किन आजाराची लागण  झाली आहे. तर 1435 जनावरे पूर्णपणे बरी झाली आहेत. प्रत्येक जिल्ह्यात औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यामुळे पशुधन पालक शेतकऱ्यांनी घाबरून न जाता पशुधनाची काळजी घ्यावी, असे महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त धनंजय बरकाळे यांनी केले आहे.

हेही वाचा : पारंपारिक शेतीला फाटा देत अख्खं गाव करतयं केळीची शेती!

कसा ओळखावा आजार?

कॅप्रिपॉक्स नावाच्या विषाणूमुळे जनावरांना हा लम्पी स्किन आजार होतो. हा आजार फक्त गाय आणि म्हशींनाच होतो. गाई म्हशींना 104-105 फॅरेनाईट ताप येतो. त्यांचे खाण्याचे प्रमाण कमी होते. दूध देणाऱ्या जनावरांचे दूध कमी होते. अनेकदा जनावरे लंगडतात देखील आणि त्यानंतर पाच ते सहा दिवसानंतर जनावरांच्या अंगावर मोठ मोठ्या गाठी येतात. या गाठी कासेला मानेवरती अशा मऊ ठिकाणी येतात. तसेच त्या सर्वांगावर देखील पसरू शकतात. एवढेच नाही तर जनावरांच्या अंतर्गत भागांमध्ये देखील गाठी येतात. जनावरे चारा खात नाहीत.

या पद्धतीने घ्या काळजी

लम्पी स्किन आजारामुळे पशुपालकाने घाबरून जायचे कारण नाही. ज्या जनावरांमध्ये या आजाराची लक्षणे आढळून आली आहेत. त्या जनावरांचा आजार चार ते पाच दिवसाच्या उपचारानंतर पूर्णपणे बरा करता येतो. यासाठी जनावरांना वेळेत लसीकरण करणे गरजेचे आहे. या आजारावरती संपूर्णपणे लसीकरण मोफत आहे. त्यासाठी पशुपालकाने आपल्या जवळील पशु वैद्यकीय अधिकारी अथवा दवाखान्याशी संपर्क साधावा आणि जनावरांचे लसीकरण करून घ्यावे,असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आलं आहे.

हेही वाचा : लम्पी व्हायरसचा दुधावरही परिणाम? माणसांसाठी हे हानिकारक ठरेल का? तज्ज्ञांनी दिली उत्तरं

कसा पसरतो हा आजार

हा आजार संसर्गजन्य आजार आहे.  हा जनावरांना एकमेकांच्या त्वचेमुळे पसरतो. तसेच जनावरांवरील असणारे गोचीड आणि इतर कीटकांच्यामुळे एका जनावरांपासून दुसऱ्या जनावरांला होतो. वैरण चारा याद्वारे देखील जनावरांचा एकमेकांना संपर्क आल्याने हा आजार पसरवू शकतो. यामुळे यावरती उपाय म्हणून जनावरांचे विलगीकरण करणे आवश्यक असते. तसेच कीटकनाशकांची फवारणी देखील करणे आवश्यक आहे.

या नंबरवर संपर्क साधा

आतापर्यंत चार लाख 78 हजार गाई म्हशींना ही लस दिली गेलेली आहे. आपल्या प्राण्यांचा लसीकरणासाठी व इतर उपचारांसाठी महाराष्ट्र राज्य सरकार तर्फे दिलेल्या खालील टोल फ्री नंबर वरती संपर्क करावा. तसेच या आजाराचे लसीकरण सर्व राज्यभर मोफत आहेत. 1962 आणि 18002300418 या टोल फ्री नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन धनंजय बरकाळे यांनी केले आहे.

First published:

Tags: Pune