मुंबई 13 सप्टेंबर : देशात पशुपालन हे शेतकरी वर्गाचं उत्पन्नाचं मोठं साधन आहे. मात्र, आता शेतकऱ्यांचं पशुधन हे लम्पी व्हायरसचा (Lumpy virus) प्रादुर्भाव वाढत असल्याने संकटात आलं आहे. हा व्हायरस देशातील अनेक राज्यांमध्ये कहर करत आहे. लम्पी व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता बाधित राज्यं बचावासाठी सर्व उपाययोजना करत आहेत. गायींवर मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रार्दुभाव होत असल्याने दुधाचं संकट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण या व्हायरसचा थेट परिणाम दूध उत्पादनावर होतोय. उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात लम्पी व्हायरसचा कहर सातत्याने वाढत असताना दुसरीकडे त्याचा थेट परिणाम गायीच्या दुधावर होताना दिसतोय. आतापर्यंत, हा व्हायरस उत्तर प्रदेशातील 25 जिल्ह्यांमध्ये पोहोचला असून त्याचा सर्वाधिक प्रभाव मुझफ्फरनगर, सहारनपूर आणि अलीगढमध्ये दिसतोय. राज्यात 15 लाखांहून अधिक गायी याच्या विळख्यात आल्या असून त्यापैकी 25 हजारांना थेट लागण झाली आहे. पुण्याच्या ग्रामीण भागात लम्पीरोगाचा उद्रेक, 20 जनावर बाधित, 3 जणांचा मृत्यू लम्पी व्हायरसचा संसर्ग गायींसाठी धोकादायक आहे. गाईच्या दुधावरही त्याचा परिणाम दिसून येतोय. या संदर्भात लखनऊ विभागाचे मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी आणि तज्ज्ञ अरविंद कुमार वर्मा यांनी सांगितलं की, ‘गाईच्या दुधात लम्पी व्हायरसचा प्रभाव दिसून येत असून दुधातही व्हायरसचे घटक आढळतात.’ मात्र, गाईच्या दुधात असलेले विषाणू दूर केले जाऊ शकतात. यासाठी दूध जास्त वेळ उकळावं. माणसांसाठी यामध्ये कोणतेही हानिकारक घटक शिल्लक नाहीत. परंतु हे दूध जर गाईच्या पाडसाने म्हणजेच वासराने प्यायलं तर ते त्याच्यासाठी हानिकारक ठरू शकतं. अशा स्थितीत वासराला गाईपासून वेगळं करावं. लम्पी व्हायरसचा थेट परिणाम गाईच्या दूध उत्पादनावर आणि गर्भाशयावर होतो. तज्ज्ञांच्या मते, हा रोग दुधाच्या उत्पादनावर परिणाम करतो, जे 50 टक्क्यांनी कमी होतं. हा आजार आर्थिक नुकसानीचा आजार आहे. यामध्ये मृत्यूचं प्रमाण 1 ते 2 टक्के आहे. महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार, औरंगाबाद-सिंधुदुर्गात ढगफुटीसदृश पाऊस, कोल्हापुरातही कहर, निसर्गाच्या रौद्ररुपाचे भयंकर VIDEO समोर माणसाला धोका नाही लम्पी व्हायरसचा माणसाला कोणताही धोका नाही, तो प्राण्यांपासून प्राण्यांमध्ये पसरतो. तज्ज्ञांच्या मते, या व्हायरसमुळे जनावरांना झालेल्या जखमांना कडुलिंब किंवा हळद आणि तुपाची पेस्ट लावल्यास जखमा भरतात आणि या आजाराने ग्रस्त गुरं 1 आठवडा ते 10 दिवसांत बरी होऊ शकतात. परंतु, यापासून मुक्त होण्याचा सर्वोत्तम उपाय लसीकरण आहे. लसीकरणामुळे व्हायरसचं संक्रमण लवकर थांबवता येतं. या व्हायरसचा संसर्ग रोखण्याबाबत तज्ज्ञांचं असं मत आहे की, ‘संक्रमित प्राण्याला इतर प्राण्यांपासून वेगळं करणं हाच एकमेव प्रभावी उपाय आहे.’ दुसरीकडे, लोकांच्या मनात एक प्रश्न आहे की, लम्पी व्हायरसने संक्रमित असलेल्या गायीच्या मूत्र आणि शेणात व्हायरसचे घटक आढळतात का? यावर तज्ज्ञांचं मत आहे की, व्हायरसचा त्यावर कोणताही प्रभाव दिसत नाही. तसंच, जे लोक गोमूत्र किंवा शेण वापरतात त्यांच्यावर कोणतेही हानिकारक परिणाम होत नाहीत. त्यामुळे गोमूत्र आणि शेणाचा वापर करणं जोखमीचं नाही. लम्पी व्हायरस वेगाने पसरत असल्यामुळे याची गंभीर दखल सरकारने घेतली आहे. लम्पी व्हायरसचा प्रसार थांबवण्यासाठी सरकारने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.