मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पारंपारिक शेतीला फाटा देत अख्खं गाव करतयं केळीची शेती! पाहा Video

पारंपारिक शेतीला फाटा देत अख्खं गाव करतयं केळीची शेती! पाहा Video

पारंपारिक पिकांना फाटा देत शेतकरी दर्जेदार केळीच्या उत्पादनाला प्राधान्य देत आहेत. शेतकऱ्यांनी टिशुकल्चर केळीचे वान असलेल्या रोपांची लागवड केली आहे.

पारंपारिक पिकांना फाटा देत शेतकरी दर्जेदार केळीच्या उत्पादनाला प्राधान्य देत आहेत. शेतकऱ्यांनी टिशुकल्चर केळीचे वान असलेल्या रोपांची लागवड केली आहे.

पारंपारिक पिकांना फाटा देत शेतकरी दर्जेदार केळीच्या उत्पादनाला प्राधान्य देत आहेत. शेतकऱ्यांनी टिशुकल्चर केळीचे वान असलेल्या रोपांची लागवड केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Akola, India
  • Published by:  News18 Desk

अकोला, 13 सप्टेंबर : शासकीय योजनांचा फायदा आणि नवतंत्रज्ञानाचा आधार घेऊन शेतीतून सोनं कसं पिकवता येतं, हे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे. जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या पणज, बोचरा, शहापूर, बाघोडासह इतर गावातील शेतकऱ्यांनी केळी पिकाला (Banana crop) प्रथम पसंती दिली आहे. पारंपारिक पिकांना फाटा देत शेतकरी दर्जेदार केळीच्या उत्पादनाला प्राधान्य देत आहेत. यशस्वी शेतीचा मंत्र देणारी केळी उत्पादकांची यशोगाथा पाहूयात…

तब्बल 60 किलो वजनाचा घड

जिल्ह्यातील तेल्हारा, अकोट आणि अमरावतीच्या अंजनगाव या तालुक्यांची ओळख केळी उत्पादक तालुके म्हणून  होत आहे. अकोट तालुक्यातल्या पणज, बोचरा येथील शेतकऱ्यांनी केळीची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. गहू, कापूस, ज्वारी, कांदा, भाजीपाला आदी पारंपरिक पिकांना फाटा देत गावच्या शिवारात केळीच्या बागा बहरल्या आहेत. शेकडो एकर शेतीत केळीच्या पिकातून तब्बल लाखो रुपयांच उत्पन्न घेतले जात आहे. शेतकऱ्यांनी टिशुकल्चर केळीचे वान असलेल्या रोपांची लागवड केली आहे. या केळीच्या प्रत्येक झाडाला 30 ते 40 किलो वजनाचा घड लागला आहे. एका झाडाला तर तब्बल 60 किलो वजनाचा घड आढळून आला. लागलेला खर्च वजा करता शेतकरी या शेतीतून लाखांचे उत्पन्न मिळत आहे.

जगभरात पसरलेल्या कोरोना संकटानं केळीला चांगला भाव मिळत नव्हता. अनेक शेतकऱ्यांना तर अक्षरशः बागा उद्ध्वस्त कराव्या लागल्या. परंतु, मागील महिन्यात केळीला चांगला भाव मिळाल्याने शेतकरी आनंदीत असताना आता परत केळीचे भाव कमी झाले आहे. केळीला भावचं नसल्यानं केळी उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. वाढीव म्हणजेचं 1 हजारावर भाव मिळाल्यास केळी उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होईल, अशी अपेक्षा केळी उत्पादक शेतकऱ्यांना आहे.

 रेकॉर्ड ब्रेक भाव

राज्यात केळीचा भाव जळगाव जिल्ह्यातील रावेरच्या बाजारपेठेतील किमतींवरून ठरवला जातो. सध्या जागेवर प्रतिक्विंटल 700 ते 750 भाव आहे. निर्यातदार कंपनी यापेक्षा शंभर रुपये अधिक भाव शेतकऱ्यांना देतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या केळीला चांगला भाव मिळतो. पण त्यासाठी दर्जेदार मालाची मागणी केली जाते. मात्र, मागील आठड्यात केळीचा भाव हा 1 हजार 900 इतका होता, अकोल्यात हा रेकॉर्ड ब्रेक भाव असल्याचे शेतकरी सांगतात. आता केळीच्या भावाची घसरण झाली असून सध्या 700 ते 750 रुपये भाव शेतकऱ्यांना मिळत आहे.

एका झाडाला 100 रुपये खर्च

दरम्यान, सध्या केळी पिकाला प्रत्येकी लागवड 100 रुपये खर्च येतो, परंतु, सद्यःस्थितीत केळीला भाव कमी आहे. शेतकरी नफ्यापासून वंचित आहेत. त्यामुळे केरळ राज्यासारखा भाव इथेही लागू व्हावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

हेही वाचा- वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; फळबागा जमीनदोस्त, पिकांचेही अतोनात नुकसान पाहा VIDEO

400 हेक्टरवर लागवड

पणज परिसरात जवळपास 400 हेक्टरवर शेतकऱ्यांनी केळी पिकाची लागवड केली आहे. पण केळीला भावचं नाही, शेतकरी आर्थिक संकटात आला आहे. भविष्यात अनेक शेतकरी केळी पिकाला नापसंती देऊ शकतात. त्यामुळे आता मायबाप सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष घालावे, अशी मागणी येथील शेतकरी करीत आहेत.

शेतकऱ्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न शेतमालाला मिळणाऱ्या कमी भावातच दडलेला आहे. त्यामुळे पिक पद्धतीतील नवे प्रयोग, उत्कृष्ट व्यवस्थापनासह दर्जाची जोड आणि योग्य विपणन व्यवस्था या चतू:सुत्रीवर शेती केली तरच यशस्वी शेती करणे शक्य आहे.

First published:

Tags: Akola, Akola News, Farmer