पुणे, 10 ऑगस्ट : फुटबॉल, क्रिकेट, कबड्डी या खेळांच्या लीग स्पर्धा प्रचंड यशस्वी ठरल्या आहेत. या यशस्वी लीग नंतर महाराष्ट्राच्या मातीमधला अस्सल खेळ असलेल्या ‘खो-खो’ चा लीगचा पहिला सिझन यावर्षी होणार आहे. 14 ऑगस्टपासून पुण्यातील बालेवाडी स्टेडियममध्ये ही स्पर्धा होणार आहे. एका खेळामुळे एखाद्याच्या आयुष्यात काय बदल होऊ शकतो हे समजून घेण्यासाठी या लीगमधील मुंबई खिलाडीज (Mumbai Khiladis) टीमचा कॅप्टन विजय हजारेचा (Vijay Hazare) आजवरचा प्रवास पाहिला पाहिजे. पानटपरी चालकाचा मुलगा अल्टीमेट खो-खो लिगचा (Ultimate Kho Kho League 2022) पहिल्याच सिझनमधील विजेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून मुंबई खिलाडीजकडं पाहिलं जात आहे. मुंबईच्या टीममध्ये अनेक अनुभवी आणि तरूण खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे ही टीम चांगलीच संतुलित मानली जात आहे. संपूर्ण खो-खो विश्वाचं लक्ष लागलेल्या मुंबईच्या टीमची कॅप्टनसी विजय करणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी हे विजयचं मूळ गाव. विजयचे वडील पानटपरी व्यावसायिक. त्यामुळे आर्थिक परिस्थिती बेताची. या कुटुंबातील मुलांना अनेकदा जबाबदारीचं ओझं सांभाळण्यासाठी त्यांचा खेळ बंद करावा लागतो. पण, विजयसाठी त्याचा खेळच आयुष्याचा आधार बनला. मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूनं उचललं मोठं पाऊल, क्रिकेटमधून संन्यास घेणार? गरिबीला दिला ‘खो’ खो-खोने आयुष्य कसं बदललं याची गोष्टचं 26 वर्षांच्या विजयनं Local18 ला बोलताना सांगितली. मला खेळाची लहानपणापासूनच आवड होती. तसेच मी अभ्यासामध्ये देखील व्यवस्थित होतो. पण अभ्यासापेक्षा खेळाकडे माझं जास्त लक्ष होतं. पण, मी नेहमीच खो-खो खेळाला सर्वस्व दिलं. त्यामुळे माझी राष्ट्रीय टीममध्ये निवड झाली. आंतरराष्ट्रीय सामने खेळल्यानंतर मला रेल्वेमध्ये नोकरी मिळाली. त्यामुळे माझ्यावरचं घरच्या जबाबदारीचं टेन्शन कमी झालं. मी खेळात करिअर करू शकेल, असं सुरूवातीला आई-वडिलांना वाटलं नव्हतं. कारण आपल्या इथं खो-खो किंवा अन्य मातीतल्या खेळातील खेळाडूंचे करिअर घडणे अवघड असते. पण, मला सर्व काही खेळामुळेच मिळाले आहे. मी या खेळाच्या जोरावरच स्थिरावलो आहे. स्वत:चा पॉडकास्ट सुरू करायचा आहे? पुणे विद्यापीठाच्या कोर्ससाठी लगेच करा अर्ज, VIDEO मुंबई खिलाडीज सज्ज 14 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या अल्टिमेट खो-खो लीगमध्ये खेळण्यासाठी आमची टीम सज्ज आहे, असा विश्वास विजयनं व्यक्त केला आहे. आम्ही प्रत्येक संघानुसार रणनीती तयार करत आहोत. आमची टीम एकजूट आणि मजबूत आहे. आमचा एकमेकांवर विश्वास आहे. या खेळात एकमेकांवरील विश्वासाची सर्वात जास्त गरज असते,’ अशी भावना विजयनं बोलून दाखवली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.