पुणे, 10 ऑगस्ट : अन्न, वस्त्र, निवारा नंतर मोबाईल ही देखील सध्या अनेकांसाठी मुलभूत गोष्ट बनली आहे. मोबाईल वापरणाऱ्यांची देशातील संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. त्यामध्ये स्मार्टफोन वापरणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. स्मार्टफोनचा वापर हा एकमेकांशी बोलण्याबरोबरच फोटो, व्हिडीओ काढणे यासाठी देखील केला जातो. त्याचबरोबर बदलत्या जगातील पॉडकास्ट (Podcast), सोशल मीडिया मार्केटींग (Social Media Marketing) यासाठी देखील स्मार्टफोन उपयोगाचा आहे. मोबाईलचा वापर बदलत्या काळातील गरजेनुसार करण्याची ज्यांची इच्छा आहे, अशा सर्वांसाठी एक खास प्रशिक्षण कोर्स (Organized mobile video production podcast production, Social media marketing workshop for common citizens) हा विशेष कोर्स पुणे विद्यापीठाकडून सुरू होणार आहे. काय आहे कोर्स? सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभाग म्हणजेच रानडे इन्स्टिट्यूटतर्फे हा विशेष प्रशिक्षण वर्ग होणार आहे. 22 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या कालावधीमध्ये होणाऱ्या या कोर्सची फी 2 हजार रूपये आहे. या कोर्समध्ये 12 वी परीक्षा पास झालेल्या सर्वांना प्रवेश घेता येईल. या कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी चांगल्या प्रतीचा कॅमेरा असलेला मोबाईल फोन असणे आवश्यक आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर एका बॅचमध्ये फक्त 20 जणांना प्रवेश देण्यात येईल. अनुभवी पत्रकार प्रतिभा चंद्रन या कोर्समध्ये सर्वांना प्रशिक्षण देतील. तसंच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना उपस्थितीचे प्रमाणपत्रही दिले जाईल.
12वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी खूशखबर! तब्बल 1,25,000 रुपये पगारासह इथे मिळतेय सरकारी नोकरी
कुठं करणार अर्ज ? पुणे विद्यापीठाच्या
www.unipune.ac.in
या संकेतस्थळावर कॉन्फरन्स अँड वर्कशॉप या विभागात या कोर्सचा अर्ज उपलब्ध आहे. याबाबतच्या अधिक माहितीसाठी 8408057892 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागाच्या प्रमुख डॉ. उज्ज्वला बर्वे यांनी केलं आहे.
गुगल मॅप वरून साभार अर्ज करण्यासाठी लिंक
https://events.unipune.ac.in/apps/applicant/login.aspx
या लिंक वरून तुम्ही अर्ज करू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.