पुणे, 2 नोव्हेंबर : मांसाहार टाळून शाकाहारी होण्याचा ट्रेंड जगभर आढळतो. त्याचवेळी शाकाहारी व्यक्तींमध्ये वेगन हा प्रकार लोकप्रिय होत आहे. वेगन डाएट पाळणारी मंडळी प्राणीजन्य पदार्थ टाळून फक्त वनस्पतीजन्य पदार्थ खातात. त्यामुळे त्यांना अनेकदा त्यांच्या आवडीला मुरड घालावी लागते. हे डाएट फॉलो करणाऱ्यांसाठी गुड न्यूज आहे.
पुण्यातील
एका कॅफेनं संशोधन करून वेगन आईस्क्रीम तयार केले आहे. या कॅफेत तब्बल 13 प्रकारचे वेगन आईस्क्रीम मिळते. दुधाचा वापर नाही! अनेकदा आईस्क्रीम म्हटले की आपल्याला फक्त ते दुधापासूनच बनते एवढेच माहीत असतं. वेगन पदार्थ गाईचे किंवा कोणत्याही प्राण्याचे दूध न वापरता पदार्थ बनवले जातात. यामध्ये सोयाबीनपासून टोफू पनीर सारखे पदार्थ बनवले जाते. दुधाला पर्याय म्हणून कोको पावडर तसंच फळांचा वापर केला जातो. 13 प्रकारचे आईस्क्रीम उपलब्ध पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील आईस क्राफ्ट कॅफेमध्ये वेगन आईस्क्रीम मिळते. या कॅफेत आईस्क्रीम सुरू होण्याचं कारणही खास आहे. ‘माझ्या घरामध्ये माझा भाऊ वेगन आहे. त्यावेळी हा आईस्क्रीम कसा खाणार असा प्रश्न मला पडला. माझं स्वत:चं आईसक्रीम कॅफे आहे. मी या विषयावर संशोधनन केल्यानंतर वेगन आईस्क्रीम हा पर्याय मला सापडला. आम्ही या विषयावर काम करायला सुरुवात केली.
सुदाम्याचे नऊ प्रकारचे पोहे, प्रत्येकाची चव आहे भारी! पाहा Video
आज आमच्या कॅफेमध्ये 13 प्रकारचे वेगन आईस्क्रीम मिळतात. हे सर्व आईस्क्रीम आम्ही ग्राहकांना लाईव्ह बनवून देतो. त्यामुळे ते अगदी ताजे असते. त्याची चव देखील सर्वसाधारण आईस्क्रीम सारखीच लागते,’ असं कॅफे चालक निखिल राठी यांनी सांगितलं. आम्ही येथे प्री-वेडिंग शूट साठी आलो होतो आणि इथली आम्ही नवीन काहीतरी टेस्ट करावा म्हणून वेगळे आईस्क्रीम ट्राय केले आणि ते आम्हाला फारच आवडले, अशी प्रतिक्रिया येथील ग्राहक प्रीती बलदोटा यांनी दिली.
विराट कोहलीसारखं डाएट फॉलो करायचंय? ‘या’ पदार्थांचा करा आहारामध्ये समावेश
किती आहे किंमत? 249 रुपयाला हे आईस्क्रीम मिळते. यामध्ये एकूण पाच रोल असतात.
गुगल मॅपवरून साभार
कुठे खाणार वेगन आईस्क्रीम? आईसक्राफ्ट कॅफे, फर्ग्युसन रोड, वैशाली हॉटेलच्या समोर, पुणे - 411004