जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Pune : सुदाम्याचे नऊ प्रकारचे पोहे, प्रत्येकाची चव आहे भारी! पाहा Video

Pune : सुदाम्याचे नऊ प्रकारचे पोहे, प्रत्येकाची चव आहे भारी! पाहा Video

Pune : सुदाम्याचे नऊ प्रकारचे पोहे, प्रत्येकाची चव आहे भारी! पाहा Video

Pune: कृष्ण आणि सुदाम्याच्या गोष्टीतील पोहे सर्वांना माहिती आहेत. आता पुण्यातही सुदाम्याचे 9 प्रकारचे पोहे मिळतात. या प्रत्येक पोह्याची चव ही एकदम भारी आहे.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

    पुणे, 1 नोव्हेंबर :  पोहे हा घरोघरी बनवला जाणारा नाश्त्याचा प्रकार आहे. झटपट बनणारे कांदे पोहे तर प्रसिद्ध आहे. अनेकदा शुभ कार्यासाठी देखील आपल्या घरी पोहे बनवले जातात. कांदेपोहेसह बटाट्याचे पोहे, मिक्स व्हेजिटेबल पोहे हे प्रकार प्रामुख्यानं घरी केले जातात. पुण्यात एकाच छताखाली पोह्याचे नऊ प्रकार खायला मिळतात. कृष्ण आणि सुदाम्याची पोह्यासंबंधीची गोष्ट ही प्रसिद्ध आहे. त्यामधील सुदाम्याच्या पोह्याची आठवण म्हणून या पोह्यांचीही सुदाम्याचे पोहे असे नाव देण्यात आले आहे. प्रत्येकाची चव भारी! संदेश भोसले या तरुणाने 2019 साली सुदाम्याचे पोहे सुरू केले होते. हे पोहे इतर पोह्यांपेक्षा वेगळे असावे म्हणून त्यांनी पोह्यामध्ये विविध प्रकार ठेवले होते. त्यांच्या या वैविध्यपूर्ण प्रकारामुळे अगदी कमी कालावधीमध्ये हे पोहे पुण्यात प्रसिद्ध झाले आहेत. इथं एकूण नऊ प्रकारचे पोहे मिळतात. प्रत्येक पोह्याची चव ही पहिल्यापेक्षा सरस असल्याचा ग्राहकांचा अनुभव आहे. पारंपारिक कांदेपोह्यासह सांबार पोहे, कोकणी पोहे, तर्री पोहे, दडपे पोहे, दही पोहे, कुरमुरे पोहे, इंदोरी पोहे, बटाटे पोहे असे पोह्यातले विविध प्रकार इथं मिळतात. एका छोट्या आउटलेटपासून त्यांनी हा प्रवास सुरु केला. आता पुण्यामध्ये त्यांची 20 आऊटलेट असून सर्व ठिकाणी आम्ही पदार्थाची चव आणि दर्जा जपला आहे, असे भोसले सांगतात. पुण्यात मिळते सुप्रसिद्ध SPDP, पाहा काय भन्नाट कॉम्बिनेशन VIDEO संदेश भोसले यांनी सुरुवातीच्या काळातील अनुभवाबद्दल बोलताना सांगितले की, ‘आम्ही सुरूवातीला ग्राहकांची एक-एक तास वाट बघितली आहे. तासाभरानंतर एखादा ग्राहक आला तर तोपर्यंत पोहे थंड होत असतं. पण, आम्ही ते पोहे बाजूला ठेवून गरमागरम पोहे ग्राहकांना देत असू. अगदी कमी कालावधीमध्ये आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळाला. आता पुण्यात आमचे 20 आऊटलेट असून सर्वत्र आम्ही आमचा दर्जा जपला आहे. ‘सुदाम्याचे पोह्यांमध्ये आम्हाला दरवेळेस ऑप्शन असतात. प्रत्येक वेळी नवीन पद्धतीचे पोहे खाण्याची आम्हाला उत्सुकता असते. आम्ही आवर्जुन इथं पोहे खायला येतो,’ अशी प्रतिक्रिया ग्राहकांनी व्यक्त केली आहे. Pune : झणझणीत मिसळीचा रंग तांबडा नाही तर हिरवा, पाहा VIDEO गुगल मॅपवरून साभार कुठे मिळतील सुदाम्याचे पोहे? दगडूशेठ हलवाई मंदिर रोड, शनिवारवाडा मुख्य गेट, कसबा पेठ पुणे.  पिन. - 411011

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात