मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /विराट कोहलीसारखं डाएट फॉलो करायचंय? 'या' पदार्थांचा करा आहारामध्ये समावेश

विराट कोहलीसारखं डाएट फॉलो करायचंय? 'या' पदार्थांचा करा आहारामध्ये समावेश

वेगन डाइट

वेगन डाइट

विराट कोहली वेगन डाएट घेतो. भारतामध्ये विराट कोहलीमुळेच वेगन डाएटला जास्त प्रसिद्धी मिळाली, असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. आता हे, वेगन डाएट नेमकं काय आहे? त्याचा कसा फायदा होतो? वेगन डाएटचा अवलंब कसा करावा? जाणुन घ्या

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 01 नोव्हेंबर : स्वत: ला फिट ठेवण्यासाठी विविध क्षेत्रांतील सेलिब्रिटीज विविध प्रकारचं डाएट फॉलो करतात. काही विशिष्ट प्रकारच्या पदार्थांचाच आपल्या आहारामध्ये समावेश करण्याला डाएट म्हटलं जातं. डाएटच्या बाबतीत, भारतीय क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन आणि क्रिकेटपटू विराट कोहली सर्वांत जास्त चर्चेत असतो. विराट कोहली वेगन डाएट घेतो. भारतामध्ये विराट कोहलीमुळेच वेगन डाएटला जास्त प्रसिद्धी मिळाली, असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. आता हे, वेगन डाएट नेमकं काय आहे? त्याचा कसा फायदा होतो? वेगन डाएटचा अवलंब कसा करावा? याबाबत जागृती निर्माण व्हावी यासाठी दरवर्षी 1 नोव्हेंबरला जगभरात 'वर्ल्ड वेगन डे' साजरा केला जातो. ‘टीव्ही 9 भारतवर्ष’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

  वेगन डाएट म्हणजे काय?

  वेगन डाएट हा असा आहार आहे, ज्यामध्ये लोक फक्त वनस्पतींपासून मिळणाऱ्या पदार्थांचं सेवन करतात. या डाएटमध्ये हिरव्या भाज्या, फळं आणि नट्सचा समावेश होतो. त्यात दूध, दही, पनीर, खवा, लोणी आणि मधसुद्धा खाल्ला जात नाहीत. कारण हे पदार्थ प्राण्यांपासून मिळालेले असतात. सध्या, वेगन डाएटला जगातील सर्वोत्तम आहार मानलं जातं. आहारतज्ज्ञांच्या मते, वेगन डाएट हा संपूर्ण आहार आहे. त्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन्स, मॅग्नेशियम आणि विविध पोषकतत्त्वांचा समावेश असतो. शरीराला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी असा आहार उपयुक्त ठरतो. खालील पदार्थांचा आहारात समावेश करून तुम्हीदेखील वेगन डाएट फॉलो करू शकता.

  हेही वाचा - हृदयाच्या आरोग्यासाठी आहारात `या` मॅग्नेशियमयुक्त पदार्थांचा समावेश हवाच

  मांस खाण्याऐवजी मशरूम खा: वेगन डाएटमध्ये मांसाहारी पदार्थांना अजिबात स्थान नाही. त्यामुळे मांसाहारातून मिळणारी चव आणि पोषक घटकांची कमतरता कशी पूर्ण करायची हा मोठा प्रश्न असतो. ही कमतरता तुम्ही मशरूम खाऊन भरून काढू शकता. अगदी मांसाहारी पदार्थांची चव देणारे विविध पदार्थ तुम्ही मशरूमपासून बनवू शकता.

  दुधाऐवजी प्या कोकोनट मिल्क: आपल्याला लहानपणापासूनच दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. कारण, दुधामध्ये कॅल्शियमसारखे अनेक पोषक घटक असतात. वेगन डाएटमध्ये दूध आणि दुधापासून तयार केलेले पदार्थ खाता येत नाहीत. प्राण्यांपासून मिळणाऱ्या दुधाची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही नारळ, काजू आणि बदामाचं दूध पिऊ शकता.

  पनीरऐवजी खा टोफू: प्राण्यांच्या दुधापासून तयार केलेलं पनीर आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. वेगन डाएटमध्ये तुम्हाला दुधापासून तयार केलेलं पनीर खाता येणार नाही. याऐवजी तुम्ही टोफूचा आहारामध्ये समावेश करू शकता. सोयाबीन मिल्कपासून टोफू तयार केलं जातं.

  मधाऐवजी गुळ खा: वेगन डाएट फॉलो करत असताना मधसुद्धा खाल्ला जात नाही. कारण, मध हा मधमाश्यांपासून मिळतो. मधाऐवजी तुम्ही गूळ खाऊ शकता. उसाच्या रसापासून तयार केलेल्या गुळामध्ये अनेक पोषकतत्त्वं असतात.

  First published:
  top videos

   Tags: Health