मुंबई, 06 जुलै: काली
( Kaali) या डॉक्युमेंट्री सिनेमाच्या पोस्टरचा वाद काही दिवसांपासून पाहायला मिळतोय. निर्माती लीना मणिमेकलाई
(Leena Manimekalai) हिच्या काली या डॉक्युमेंट्री सिनेमात काली माता सिगरेट ओढताना दाखवण्यात आली होती. तिच्या हातात LGBTQचा झेंडा देखील दाखवण्यात आला. या पोस्टवर संपूर्ण देशातून विरोध करण्यात आला. हा वाद चांगलाच रंगला आहे आणि आता भारताच्या विनंतीवर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या ट्विटरनं कालीचं पोस्टर ट्विटरवरुन हटवलं आहे
( Twitter Remove Kali Film Poster) काली या डॉक्युमेंट्री सिनेमाला हिंदू संघटनांकडून कडाडून विरोध करण्यात आला होता. हिंदू धर्मियांच्या भावना दुखवल्याचा आरोप सिनेमाच्या निर्मातीवर करुन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.
काली सिनेमाच्या आक्षेपार्ह पोस्टवर देशात विविध ठिकाणी FIR दाखल करण्यात आल्या. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मुंबईमध्ये हिंदू धर्मियांच्या भावना दुखवल्याचा आरोप करत FIR दाखल करण्यात आल्यात. त्याचप्रमाणे अनेकांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना ट्विट टॅग करुन सिनेमाची दिग्दर्शिका लीना मनिमेकलाई हिला अटक करण्याची मागणी करण्यात आली होती.
हेही वाचा -
लग्नाच्या भीतीने घर सोडलं, प्रेमप्रकरणही गाजलं; आता 'काली'च्या पोस्टरवरुन वाद.. कोण आहे Leena Manimekalai?
काली या सिनेमाचं पोस्टर कॅनडामध्ये आयोजित करण्यात आलेल्या अंडर द टेंट या प्रोजेक्ट अंतर्गत प्रदर्शित करण्यात आलं. कॅनडामधील भारतीय उच्चाआयोगात या पोस्टरला विरोध करण्यात आला. पोस्टरमध्ये असलेल्या आक्षेपार्ह कंटेंट काढून टाकण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर कॅनडाच्या ज्या म्युझिअममध्ये पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होते तिथल्या लोकांनी हिंदूच्या भावना दुखावल्यानं खेद व्यक्त करत माफी मागितली होती.
काली पोस्टरच्या वादावरुन सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. कलाकारांपासून ते समाजिक नेत्यांपर्यंत सर्वांनी पोस्टवर आक्षेप नोंदवला.
काली सिनेमाची निर्मिती असलेली मणिमेकलाई या आधीही सिनेमांवरुन वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या पूर्वीही आपल्या डॉक्युमेंट्री फिल्म्सच्या ती चर्चेचा विषय ठरली होती. देवदासी प्रथेवर बनवलेली माथम्मा (Mathamma) या डॉक्युमेंट्रीवर अनेकांनी आक्षेप नोंदवला. दलित महिलांवर होणाऱ्या हिंसेबाबत बनवलेली पराई (Parai) आणि धनुषकोडीमधील मच्छिमारांवर बनवलेली सेंगदाल (Sengadal) या डॉक्युमेंट्री फिल्म्समुळे निर्माती मणिमेकलाई वादाच्या भोवऱ्यात सापडली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.