मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

चोरट्यांचा नवा फंडा; Instagram वर आली एक लिंक अन् पुण्यात उच्चशिक्षित तरुणीला लाखोंचा गंडा

चोरट्यांचा नवा फंडा; Instagram वर आली एक लिंक अन् पुण्यात उच्चशिक्षित तरुणीला लाखोंचा गंडा

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या दादरा नगर हवेली येथे नोकरीला असून त्या पुण्यात त्यांच्या नातेवाईकांकडे आल्या होत्या. 3 ऑक्टोबर रोजी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अ‍ॅमेझॉनची एक लिंक आली

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे 07 ऑक्टोबर : पुण्यात सायबर गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढतच आहे. यामध्ये सर्वाधिक गुन्हे हे आर्थिक फसवणुकीचे आहेत. फसवणुकीचे नवनवीन फंडे हे सायबर गुन्हेगार शोधत असतात. असाच एका नव्या पद्धतीने पुण्यात एका तरुणीला तब्बल 1 लाख 13 हजारांना गंडा घातला आहे. यावरून नागपूरच्या 23 वर्षाच्या तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार डायना स्पेन्सर नावाच्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या दादरा नगर हवेली येथे नोकरीला असून त्या पुण्यात त्यांच्या नातेवाईकांकडे आल्या होत्या. 3 ऑक्टोबर रोजी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अ‍ॅमेझॉनची एक लिंक आली. त्यामध्ये ई कॉमर्सच्या माध्यमातून गुंतवणूक करा आणि पैसे कमवा असे लिहिले होते. तेव्हा त्यांनी त्यावर क्लिक केले. त्यानंतर त्यांना एका मोबाईलवरुन मेसेज आला आणि त्यांना सर्व रजिस्ट्रेशन प्रक्रिया समजून सांगितली.

तेलही गेलं, तूपही आणि हाती आलं धुपाटणं, वसईत व्यापाऱ्याला कोट्यवधींचा चुना

यात लॉगिन करुन तुम्ही जर रिचार्ज केले तर तुमचे कमिशन तुमच्या खात्यात जमा केले जाईल, असा मेसेज आला. एक पेज ओपन झाले. तरुणीने याठिकाणी सर्व माहिती भरुन त्यावर रजिस्ट्रेशन केलं. लॉगिन करताच एक अ‍ॅमेझॉनचे पेज ओपन झाले. त्यामध्ये तिला सुरुवातीला रिचार्ज करण्यास सांगितले. त्याप्रमाणे तिने सुरुवातीला त्या पेजवरुन 200 रुपये रिचार्ज केला. त्यानंतर तिच्या खात्यात लगेच 400 रुपये जमा झाल्याचा मेसेज आला. म्हणून तिचा विश्वास बसला. त्यानंतर तिला एक टास्क दिला.

यात तिला आणखी रिचार्ज करायला सांगितलं. तेव्हा तिने पुन्हा 500 रुपयांचे रिचार्ज केले त्यानंतर तिच्या खात्यात ९६० रुपये जमा झाल्याचा मेसेज आला. अशाप्रकारे तिचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर तिला पुन्हा 1 हजार रुपयांचा रिचार्ज करण्यास सांगितलं. मात्र तिने रिचार्ज केल्यानंतर तिच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत.

VIDEO : किती भयानक आहे हे सगळं! मुंबईत चोरटे बिनधास्त घरात शिरतात, दागिने-पैसे चोरुन नेतात

यानंतर तरुणीने विचारणा केल्यावर 'तुम्हाला टॉपअप मारल्यानंतर तुमचं कमिशन तुमच्या खात्यात जमा करणार म्हणून सांगितलं गेलं'. तिने पुन्हा १ हजार रुपयांचे टॉपअप मारले. तरीही तिच्या खात्यात पैसे जमा झाले नाही. तिला यानंतर वारंवार रिचार्ज करायला सांगितलं. त्याप्रमाणे ती रिचार्ज करीत गेली. प्रत्येकवेळी काहीतरी कारण सांगून तिला पुन्हा रिचार्ज करण्यासाठी सांगितलं गेलं.

काहीही न करता पैसे मिळणार असं वाटल्याने तरुणी भुलली आणि रिचार्ज करीत गेली. अशाप्रकारे तिने तब्बल १ लाख १३ हजार १३७ रुपयांचे रिचार्ज दुपारी २ ते साडेपाच वाजेच्या दरम्यान मारले. तेव्हा तिला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. त्यानंतर तिनं पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली आहे

First published:

Tags: Financial fraud, Money fraud