वसई, 4 सप्टेंबर : कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. कोणत्याठी ठिकाणी पैसे देताना किंवा पैशांची गुंतवणूक करताना चारवेळा चौकशी करावी, एकदा शाहनिशा झाल्यानंतरच व्यवहार करावा, असं आवाहन अनेकदा पोलिसांकडून करण्यात येतं. पण तरीही अनेक जण फसतातच. वसईमध्ये एक व्यापारी अशाच पद्धतीने फसला आहे. वसईच्या वाळीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका व्यापाऱ्याला ‘आपले सरकार’चा अधिकृत परवाना देण्याच्या नावाखाली तब्बल 1 कोटी 31 लाख 75 हजार 104 रुपयाचा गंडा घालण्यात आला आहे. संबंधित बातमी उघड झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वसईच्या वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यापाऱ्याला आपले सरकारचा अधिकृत परवाना देण्याच्या नावाखाली 1 कोटी 31 लाख 75 हजार 104 रुपयाचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यात सरकारच्या पोर्टलचा नावाचा गैरवापर केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मुख्य आरोपी शुभम वर्मा याला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आरोपीने फसवणुकीतून मिळवलेले सर्व पैसे जुगारात गमवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे तेलही गेलं आणि तूपही गेलं, हाती आले धुपाटणं, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ( J-K कारागृह महासंचालकाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा, नोकराच्या डायरीमधून अनेक गोष्टींचा उलगडा ) वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजावली येथील किराना व्यापारी जिग्नेश गोपानी यांना सरकारच्या ई पोर्टलद्वारे कंपनीचा परवाना हवा होता. हा परवाना बनवून देण्यासाठी आरोपींनी गोपानी यांना आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खास बैठकीतील असल्याचे पटवून दिले. आरोपींनी 24 मे 2021 ते 27 ऑगस्ट 2022 दरम्यान आपले सरकार या ई पोर्टलद्वारे परवाना मिळवण्यासाठी तसेच एकाच्या आयटी कंपनीचे परवाना बनविण्यासाठी शासनाकडे विविध कारणासाठी पैसे भरण्याचे सांगितले. आरोपीने व्यापाऱ्याकडून तब्बल 1 कोटी 31 लाख 75 हजार 104 रुपये घेतले. पण कामच झालं नाही. जिग्नेश गोपानी यांनी सर्व रक्कम ऑनलाईन पद्धतीने दिली होती. मात्र पैसे देऊनही काम होत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर जिग्नेश गोपानी यांनी वालीव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी शुभम वर्माला अटक केली आहे. त्याची चौकशी केली असता एक महत्त्वाची माहिती समोर आली. आरोपी शुभमला ऑनलाईन जुगार खेळण्याची सवय आहे. त्याने जुगार अॅपमध्ये सर्व पैसे लावले होते. सुरुवातीला तो त्या जुगारात काही पैसे जिंकला होता. त्यानंतर त्याने पैशांच्या हव्यासापोटी आणखी पैसे लावले आणि तेलही गेले आणि तूपही गेले हाती राहिले, अशी परिस्थिती झाली. तो जुगारात पैसे हरला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.