मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

VIDEO : किती भयानक आहे हे सगळं! मुंबईत चोरटे बिनधास्त घरात शिरतात, दागिने-पैसे चोरुन नेतात

VIDEO : किती भयानक आहे हे सगळं! मुंबईत चोरटे बिनधास्त घरात शिरतात, दागिने-पैसे चोरुन नेतात

नवी मुंबईत चोरटे बिनधास्त घरात शिरतात, दागिने-पैसे चोरुन नेतात

नवी मुंबईत चोरटे बिनधास्त घरात शिरतात, दागिने-पैसे चोरुन नेतात

सीबीडी बेलापूरमध्ये दोन दिवसांपूर्वी चार घरांमध्ये घरफोडी झाली होती. चोरट्यांनी या घरफोडीत लाखोंचा मुद्देमाल लंपास केल्याची माहिती समोर आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Chetan Patil

प्रमोद पाटील, नवी मुंबई, 4 ऑक्टोबर : मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. इथे प्रचंड लोकसंख्या आहे. मुंबई पोलिसांच्या कामाची जगभरात ख्याती आहे. या मुंबईत अनेकांचे स्वप्न पूर्ण होतात. पण या मुंबई शहरात गुन्हेगारी ही देखील डोकेदुखी आहे. त्यामध्ये चोरी ही गंभीर समस्या आहे. नवी मुंबईच्या सीबीडी बेलापूर भागात तर चोरांच्या हैदोसामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. चोरट्यांनी घराचं कुलुप तोडून घरात येणं, घरातील सामान आस्था व्यस्थ करणं आणि बक्कड सोने-चांदी, पैसे, दागिने पळवून देणं, हे किती भयानक आहे. चोरटे एव्हढी चोरी करण्याचं धाडस तरी करतात कसं? त्यांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही का? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

सीबीडी बेलापूरमध्ये दोन दिवसांपूर्वी चार घरांमध्ये घरफोडी झाली होती. चोरट्यांनी या घरफोडीत लाखोंचा मुद्देमाल लंपास केल्याची माहिती समोर आली आहे. चोरांनी सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ केला आहे. तसेच त्यांनी चांदीचे दागिने, पैसे देखील लंपास केले आहेत. यामध्ये परदेशातील नोटांचा देखील समावेश आहे. विशेष म्हणजे आरोपी हे सगळं करत असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद देखील झाले आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त्यांचे चेहरे स्पष्टपणे दिसत आहेत. पोलीस त्याच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर चोरांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

(तेलही गेलं, तूपही आणि हाती आलं धुपाटणं, वसईत व्यापाऱ्याला कोट्यवधींचा चुना)

विशेष म्हणजे घरफोडी किंवा चोरीची नवी मुंबईतील ही पहिली घटना नाही. याआधी देखील अशा अनेक घटना वारंवार घडल्या आहेत. पणतरीदेखील चोरट्यांची भीती राहिलेली नाही. पोलिसांनी काही दिवसांपूर्वी एका सराईत चोरट्याला बेड्या ठोकल्या होत्या. हा चोर खूप भयानक होता. तो विवस्त्र होऊन नवी मुंबईच्या रस्त्यांवर फिरायचा. कुणी आपल्याला पकडलं तर लगेच निसटता येईल यासाठी तो अंगाला तेल लावायचा. सुरुवातीला हा चोरटा चोर नसून भूत आहे की काय? अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली होती. पण तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. पोलिसांनी त्याच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर सापळा रचला आणि त्याला पकडलं होतं.

First published:

Tags: Crime, Mumbai