मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

निर्मला सीतारामन पवारांच्या बालेकिल्ल्यात, 'मिशन बारामती'साठी आलेल्या अर्थमंत्री पहिल्याच दिवशी भडकल्या

निर्मला सीतारामन पवारांच्या बालेकिल्ल्यात, 'मिशन बारामती'साठी आलेल्या अर्थमंत्री पहिल्याच दिवशी भडकल्या

निर्मला सीतारामन शरद पवारांच्या बारामतीमध्ये

निर्मला सीतारामन शरद पवारांच्या बारामतीमध्ये

भाजपने 2024 लोकसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या शरद पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती मतदारसंघात आहेत.

  • Published by:  Shreyas
बारामती, 22 सप्टेंबर : भाजपने 2024 लोकसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या शरद पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती मतदारसंघात आहेत. देशभरात मागच्या लोकसभा निवडणुकीत भाजप जिकडे दुसऱ्या क्रमांकावर होती, त्या मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय मंत्र्यावर देण्यात आली आहे. निर्मला सीतारामन यांच्याकडे सुप्रिया सुळे खासदार असलेल्या बारामती मतदारसंघाची जबाबदारी आहे. बारामती मतदारसंघाच्या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी निर्मला सीतारामन या पत्रकार परिषदेत संवाद साधत होत्या, पण या पत्रकार परिषदेत वारंवार लोकसभा निवडणुकीबाबत प्रश्न विचारण्यात येत असल्यामुळे सीतारामन भडकल्या. मी पक्ष संघटन मजबूत करायला आले आहे. सतत लोकसभा निवडणुकींवर प्रश्न विचारू नका, असं निर्मला सीतारामन पत्रकारांना म्हणाल्या. 'मी भाजपची संघटना मजबूत करायला आली आहे. कुठल्या परिवाराबद्दल बोलायला आली नाही. भारतात सगळ्या लोकसभा मतदारसंघावर आम्ही लक्ष केंद्रीत केलं आहे. इडी ही स्वायत्त संस्था आहे, त्यांच्या कामकाजात आम्ही दखल देत नाही. इडीची कामाची पद्धत वेगळी आहे,' असं वक्तव्य निर्मला सीतारामन यांनी केलं. 'महागाई वाढली हे मान्य नाही, याबाबत मी सभागृहात उत्तर दिलं आहे. सगळ्या जगात काय सुरू आहे ते पाहा. अमेरिकेत 40 वर्षात नव्हती तेवढी महागाई आहे. जर्मनीत 30 टक्के महागाई आहे. आपल्याकडे फक्त 2 टक्क्यांपर्यंत महागाई वाढली आहे, ती नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करतोय,' असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.
First published:

Tags: Baramati, BJP, NCP, Nirmala Sitharaman, Sharad Pawar (Politician), Supriya sule

पुढील बातम्या