पुणे 02 ऑगस्ट : रक्षाबंधन सण ( Raksha Bandhan ) हा जवळच आला आहे. या सणाच्या ( Festival ) पवित्र दिवशी बहिण भावाला प्रेमाचे बंधन म्हणून राखी बांधते. रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. यावर्षी हा पवित्र सण यावर्षी 11 ऑगस्ट 2022 रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाला राखी बांधतात आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. अशाच पवित्र बंधनाला आणखीन दृढ करण्यासाठी पुण्यातील ( Pune city ) राखी व्यावसायिक मयूर कुऱ्हाडे यांनी अनोखी राखी बनवली आहे. ही राखी साधीसुधी नसून ही राखी बांधून झाल्यानंतर या राखीपासून नवीन रोप रुजू शकते. पर्यावरण पूरक सीड राखी ‘रक्षाबंधनच्या काळामध्ये अनेकदा प्लास्टिकच्या किंवा पर्यावरणाला घातक अशा राख्या बाजारामध्ये उपलब्ध असतात. या राख्या दिसायला आकर्षक असतात. मात्र, या राख्यांमुळे पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात हानी होते. याच गोष्टीकडे लक्ष देऊन आम्ही पर्यावरण पूरक सीड राखीची संकल्पना मनात ठेवून बाजारामध्ये सीड राखी उपलब्ध करून दिली आहे’, असे राखी व्यावसायिक मयूर कुऱ्हाडे Local18 बोलताना सांगितले.
हेही वाचा: Aurangabad : दहावीनंतर व्यवसाय करण्यासाठी ‘हा’ कोर्स करा, तुमचा होईल फायदा VIDEO
काय आहेत राखीचे वैशिष्ट्ये ही राखी वापरून झाल्यावरती तुम्ही माती मध्ये लावू शकता आणि यापासून रोपे उगवू शकतात. मेथीच्या बिया, भोपळ्याच्या बिया, कोथिंबीर बिया, फुलझाड्यांच्या बिया अशा विविध बियांचा वापर या राखीत केला गेलेला आहे. या सोबतच हळदी-कुंकू म्हणून देखील बियांचा वापर या राखी मध्ये करण्यात आला आहे. हि राखी लावण्यासाठी प्रत्येक राखी सोबत एक कार्डबॉर्डचा इको फ्रेंडली कॅन खरेदी नंतर दिला जातो. कशी खरेदी केली जाऊ शकते राखी ही आपल्याला ऑनलाइन प्लॅटफॉर्म सोबतच संपूर्ण भारतात उपलब्ध होत आहे. अमेझॉन, फ्लिपकार्ट या वेबसाईट वरती ही राखी उपलब्ध आहे. त्यासोबतच ही राखी
https://ecocradle.in
या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही खरेदी करू शकता. या सोबतच इकोक्रॅडल, 1873 कॉर्पोरेट एरिना, ए-204, विठ्ठल कॉम्प्लेक्स केशवराव भूमकर चौक, नर्हे, पुणे, महाराष्ट्र 411041 या पत्त्यावर जाऊनही तुम्ही ही राखी खरेदी करू शकता. गुगल मॅप वरून साभार… हेही वाचा:
Nashik : महिलांचा अनोखा प्रयोग; शेळीच्या दुधापासून बनवला आरोग्यवर्धक साबण राखीची किंमत किती? या राखीच्या पूर्ण सेटची 130 रुपयांपासून सुरू होते. तसेच या राख्यांमुळे महिला सक्षमीकरणाला हातभार लावला जात आहे. पुण्याहून 35 महिला या राख्या बनवण्याचे काम करत आहेत. आतापर्यंत अनेकांनी ह्या राख्यांची ऑर्डर केली आहे. तसेच अजूनही ऑनलाइन पद्धतीने कितीतरी राख्यांची डिलिव्हरी केली जात आहे, असे मयूर कुऱ्हाडे यांनी सांगितले.

)







