Home /News /maharashtra /

Nashik : महिलांचा अनोखा प्रयोग; शेळीच्या दुधापासून बनवला आरोग्यवर्धक साबण

Nashik : महिलांचा अनोखा प्रयोग; शेळीच्या दुधापासून बनवला आरोग्यवर्धक साबण

गोट मिल्क सोप

गोट मिल्क सोप

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील हरणशिकार महिलांनी शेळीच्या दुधापासून गोट मिल्क सोप (Goat Milk Soap) या साबणाची निर्मिती केली आहे. या आरोग्यवर्धक साबणला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

  नाशिक  01 ऑगस्ट : शेळीच दूध (Goat Milk) हे आरोग्यासाठी चांगले असते. त्याचे अनेक चांगले फायदे आहेत. त्यामुळे या दुधाला विशेष महत्त्व आहे. हे दूध शहरात फारस मिळत नाही. मात्र, ग्रामीण भागात शेळीपालन होत असल्यामुळे दूध जास्त प्रमाणात असते. शेळीच्या दुधाचा आरोग्यासाठी चांगला फायदा बघता नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील हरणशिकार या गावातील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून शेळीच्या दुधापासून गोट मिल्क सोप (Goat Milk Soap) हा आरोग्यवर्धक साबण बनवला आहे. या साबणाला चांगली मागणी होत आहे. हरणशिकार गावातील चाळीस महिलांनी एकत्र येत उन्नती बचत गट स्थापन केला आहे. या बचत गटाच्या माध्यमातून आपण काही तरी व्यवसाय सुरू करूयात असे या महिलांनी ठरवले. कारण या सर्व महिला ग्रामीण भागातील असल्यामुळे त्यांच्या हाताला फारसे काही काम नव्हते आणि महिलांचं शिक्षण देखील जास्त झालेलं नाहीये. त्यामुळे बचत गट स्थापन करून शासनाच्या मदतीने काही तरी व्यवसाय सुरू करू काही महिलांनी शेळीच्या दुधाच्या साबणाची कल्पना मांडली कारण असे साबण जास्त कोणी उत्पादित करत नाही आणि विशेष म्हणजे आरोग्यासाठी चांगले असल्यामुळे शहरात मागणी जास्त असते. सर्व ठरल्यानंतर या महिलांनी साबण कसा बनवायचा हे पंचायत समिती मधील उमेद या अभियाना अंतर्गत प्रशिक्षण घेतले आणि आज घडीला या महिला उत्तम प्रकारे साबण तयार करून तो बाजारात विकत आहेत. यातून महिलांना महिन्याकाठी चांगला नफा मिळत आहे.

  हेही वाचा: Pune : 286 वर्ष जुने पेशवेकालीन मंदिर, श्रावणी सोमवारी होते भाविकांची गर्दी, VIDEO

  शेळीच्या दुधाच्या साबणाचे फायदे हा साबण आरोग्यासाठी फायदेशिर आहे. हा साबण वापरल्यानंतर आपली त्वचा ही मुलायम होते. तसेच गुळगुळीत आणि चमकदारपणा त्वचेला येतो. यामुळे त्वचेचा कोरडेपणा नाहीसा होतो. आपल्या डोळ्याच्या खाली जे काळे वलय पडते ते हा साबण वापरल्यानंतर पूर्णपणे नाहीसे होतात. आपल्या चेहऱ्यावर जे पुरळ असतात. ते देखील या साबणामुळे जातात. विशेष म्हणजे हा साबण पूर्णपणे आयुर्वेदिक आहे. त्यामुळे हा साबण आपल्या आरोग्यासाठी चांगला आहे. साबणाची किंमत किती आहे? शेळीच्या दुधापासून बनवलेल्या या साबणची किंमत सर्व सामान्य माणसाला परवडेल अशी आहे. 100 ग्रॅम साबणाची किंमत 30 रुपये आहे. अगदी कमी किंमतीत विक्री केली जाते. साबण बनवण्यासाठी एकूण खर्च 20 रुपये येतो. एका साबण मागे 10 रुपये नफा मिळतो. दिवसाला 1000 साबण तयार केले जातात. बचत गटाला महिन्याच्या काठी जवळपास 3 लाख रुपये या साबण विक्री मधून मिळतात. हेही वाचा: Nashik : श्रावण महिन्यात ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी जाण्यापूर्वी 'ही' बातमी वाचा! गोट मिल्क सोप ( साबण ) ऑर्डर करायचा आसल्यास येथे करा संपर्क महाराष्ट्रातूनच नव्हे तर परदेशातून देखील तुम्ही साबणाची ऑर्डर करू शकतात. प्रथमतः 8010615725 या नंबरवर तुम्ही कॉल करून किंवा व्हॉट्सॲपद्वारे तुम्ही तुमची ऑर्डर बुक करू शकता. तसेच खरेदीसाठी या हरणशिकार गाव, तालुका - मालेगाव, जिल्हा - नाशिक या पत्त्यावर भेट देऊ शकता. गुगल मॅप वरून साभार  शासनाची मदत मिळाल्यास अधिक फायदा नाशिक पंचायत समितीच्या उमेद या अभियान अंतर्गत (Umed Abhiyan) आम्हाला साबण बनवण्याचे चांगले प्रशिक्षण मिळाले. मात्र,अजून जर शासकीय पातळीवर आम्हाला चांगली आर्थिक मदत मिळाली तर आम्ही साबणाचे जास्त उत्पादन घेऊ शकतो. सद्य स्थितीत आमच्याकडे जास्त भांडवल नसल्यामुळे जशी मागणी मिळेल तसे  उत्पादन घेतो. हळूहळू आता ग्राहकांची मागणी वाढत आहे. सुरुवातीला आमचे 200 ते 300 साबण विकले जायचे आता तीच संख्या ही 500 च्या घरात पोहचली आहे. त्यामुळे साहजिकच मागणी वाढली आहे. आम्हाला यातून नफा ही चांगला मिळत आहे. मात्र, शासनाने आमच्या या उद्योगाकडे लक्ष देऊन मदत करावी, अशी विनंती उन्नती बचत गटातील स्वाती मानकर (Swati Mankar) यांनी केली आहे. शासनाचे आम्ही आभार मानतो की त्यांनी आमच्या हाताला रोजगार दिला आहे. आमचा ग्रामीण भाग असल्यामुळे महिलांच्या हाताला काम नव्हते अनेक महिला या घरी बसून होत्या मिळेल तशी मोलमजुरी करायच्या मात्र आता या उद्योगातून त्यांना चांगले पैसे मिळतात. त्यांचा घरचा खर्च भागत आहे. साबणा बरोबर आम्ही इतर देखील प्रोडक्ट तयार करतो. आता आम्हाला चांगले पैसे मिळतात. मात्र, अजून सरकारी पातळीवर आर्थिक मदत मिळाली तर आमचा व्यवसाय अजून पुढे जाईल. आमच्याकडे मोठ्या मशिनरी नसल्यामुळे आम्ही जास्त उत्पादन घेऊ शकत नाहीये, असे मत ज्योती परदेशी (Jyoti Pardeshi) यांनी व्यक्त केले आहे.
  First published:

  Tags: Lifestyle, Nashik

  पुढील बातम्या