जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Aurangabad : दहावीनंतर व्यवसाय करण्यासाठी 'हा' कोर्स करा, तुमचा होईल फायदा VIDEO

Aurangabad : दहावीनंतर व्यवसाय करण्यासाठी 'हा' कोर्स करा, तुमचा होईल फायदा VIDEO

Aurangabad : दहावीनंतर व्यवसाय करण्यासाठी 'हा' कोर्स करा, तुमचा होईल फायदा VIDEO

सरस्वती भुवन महाविद्यालयांमध्ये दहावीनंतर स्मॉल इंडस्ट्री अँड सेल्फ एम्प्लॉयमेंट ( small industry and self employment course ) हा दोन वर्षाचा कोर्स सुरु करण्यात आला आहे.

  • -MIN READ Aurangabad,Aurangabad,Bihar
  • Last Updated :

    औरंगाबाद, 02 ऑगस्ट : गेल्या काही वर्षांपासून शिक्षणाचे ( Education ) प्रमाण वाढत आहे. मात्र, त्या तुलनेत विद्यार्थ्यांना नोकऱ्यांचे प्रमाण उपलब्ध नाही. त्यामुळे  बेरोजगारी ( Unemployment ) दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक तरुणांना नोकरी मिळत नसल्यामुळे तरुण व्यवसाय करण्यासंदर्भात विचार करतात मात्र या संबंधीचे शिक्षण कुठे मिळेल असा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. तर अनेक विद्यार्थी दहावीनंतरच व्यवसायामध्ये उतरण्यासाठी तयार असतात. अशा विद्यार्थ्यांसाठी सरस्वती भुवन महाविद्यालयांमध्ये दहावीनंतर स्मॉल इंडस्ट्री अँड सेल्फ एम्प्लॉयमेंट ( small industry and self employment course ) हा दोन वर्षाचा कोर्स सुरु करण्यात आला आहे. चला तर मग या कोर्स बद्दल थोडक्यात माहिती बघूया… दहावीनंतर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल किंवा वडील उपयोजित व्यवसायाला मॉडीफाय करून त्यामध्ये तुम्हाला भविष्य घडवायचे असेल तर यासाठी तुम्हाला सरस्वती भुवन कॉलेजमध्ये स्मॉल इंडस्ट्री आणि सेल्फ एम्प्लॉयमेंट हा दोन वर्षाचा कोर्स महत्त्वाचा ठरू शकतो. या कोर्सच्या माध्यमातून तुम्ही व्यवसायासंबंधीचे बारकावे शिकून स्वतःचा  व्यवसाय मोठा करू शकता.

    हेही वाचा:   Nashik : महिलांचा अनोखा प्रयोग; शेळीच्या दुधापासून बनवला आरोग्यवर्धक साबण

    असा घेऊ शकता प्रवेश या कोर्ससाठी प्रवेश घेण्यासाठी दहावीचा मूळ मार्क मेमो, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, आधार कार्डची झेरॉक्स, दोन फोटो, जातीचे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्र आवश्यक आहेत. यामुळे प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी या कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे. शहराच्या मध्यभागी असलेल्या औरंगपुरा येथे जिल्हा परिषदेच्या मैदानाच्या समोर सरस्वती भुवन महाविद्यालय आहे. यासाठी प्रवेश घेण्यासाठी तुम्ही sanjaymahore9422@gmail.com. ईमेल आयडी वरती संपर्क साधू शकता.

    गुगल मॅप वरून साभार

    फी किती असेल? सरस्वती भुवन महाविद्यालयातील स्मॉल इंडस्ट्री अँड सेल्फ एम्प्लॉयमेंट या कोर्ससाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावी मध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक टक्के असणे गरजेचे आहे. यासाठी सीईटी पद्धतीने प्रवेश प्रक्रिया होणार नाही. यासाठी प्रत्यक्षात तुम्हाला महाविद्यालयात येऊन प्रवेश घेता येईल. प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून 15 ऑगस्ट पर्यंत या कोर्ससाठी प्रवेश घेता येणार आहे. या कोर्ससाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुलांसाठी 540 तर मुलींसाठी 300 रुपये फीस आकारण्यात येते विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचा देखील लाभ घेता येतो. हेही वाचा:  Nashik : घरामध्येच सुरू केला मसाला उद्योग; आज महिन्याला होतेय दीड लाखांची कमाई विद्यार्थ्यांना असणाऱ्या सुविधा सरस्वती भुवन महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सुसज्ज अशी लायब्ररी आहे. ज्यामध्ये शहरातील सर्वात मोठ्या लायब्ररीमध्ये या लायब्ररीचा समावेश आहे. तसेच विद्यार्थ्यांना कॉम्पुटर लॅब उपलब्ध आहेत. शहराच्या मध्यभागी असलेल्या सरस्वती भुवन मध्ये येण्यासाठी स्मार्ट सिटी बसचा वापर करता येऊ शकतो. विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वस्तीगृहांची सुविधा उपलब्ध आहेत. करिअरच्या संधी हा कोर्स केल्यानंतर विद्यार्थ्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो किंवा वडील उपार्जित व्यवसाय डेव्हलप करण्यासाठी या कोर्सचा विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो. त्यासोबतच जिल्हा उद्योग केंद्र अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ देखील या विद्यार्थ्यांना घेता येऊ शकतो. यामुळे विद्यार्थ्यांना यासाठी कर्ज देखील उपलब्ध होते. यातून विद्यार्थ्यांना व्यवसाय उभा करण्यासाठी फायदा होऊ शकतो. यासाठी महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जातं.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात