जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Pune : दिवाळीत जवळच्या व्यक्तींना द्या आकर्षक भेटवस्तू, पाहा मार्केटमध्ये काय आहे नवीन? Video

Pune : दिवाळीत जवळच्या व्यक्तींना द्या आकर्षक भेटवस्तू, पाहा मार्केटमध्ये काय आहे नवीन? Video

Pune : दिवाळीत जवळच्या व्यक्तींना द्या आकर्षक भेटवस्तू, पाहा मार्केटमध्ये काय आहे नवीन? Video

Diwali 2022 : दिवाळीमध्ये आपल्या जवळच्या व्यक्तींना बजेट फ्रेंडली भेटवस्तू काय द्यायची जाणून घ्या.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

    पुणे 20 ऑक्टोबर : दिवाळीला काहीचं दिवस शिल्लक आहेत.   दिवाळी मध्ये अनेकजण एकमेकांना भेटवस्तू देतात. पण अनेकांना आपल्या जवळच्या व्यक्तींना काय भेटवस्तू द्यावी असा प्रश्न पडला असेल. जर तुम्हालाही असा प्रश्न पडला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही जवळच्या व्यक्तींना दिवाळीमध्ये काय भेटवस्तू देऊ शकतात. चला तर याच भेटवस्तू बद्दल जाणून घेऊया. पुण्यातील रविवार पेठ येथे होलसेल मार्केटमध्ये विविध भेटवस्तू सध्या विक्रीसाठी आलेल्या आहेत. यामध्ये मुख्यत्वे विविध दिवे, सजावटीचे शोपीस, ड्रायफूट बॉक्सेस, तसेच विविध लॅम्प आहेत. सध्या दिवसाळीसाठी लॅम्प आणि दिव्यांमध्ये धातूचे दिवे आणि लॅम्प्सचा नवीन ट्रेंड आलेला आहे. यामध्ये अक्षरशः 20 रुपयांच्या छोट्याशा दिव्यापासून ते 500 रुपयांच्या मोठ्या लॅम्प पर्यंत बजेट फ्रेंडली भेटवस्तूची शॉपिंग तुम्ही करू शकता. हेही वाचा :  Pune : दिवाळीची खरेदी करण्यासाठी ‘हे’ आहेत 5 बेस्ट पर्याय, Video यामध्ये खास करून विविध आकाराच्या मेटलच्या दिव्यांना सर्वाधिक जास्त मागणी असून मेटलच्या दिव्यामध्ये विविध प्रकारचे दिवे खरेदी करू शकता. जसे की एका छोट्याशा मेटलच्या लॅम्पमध्ये तुम्ही गुलाबाच्या आकाराचे मेणाचे दिवे त्यात मेणबत्त्या ठेवून ते दिवे सजवू शकता. यासोबतच 100 रुपयांच्या पुढे जे लॅम्प उपलब्ध आहेत. त्यामध्ये तुम्ही आत दिवे लावल्यानंतर लॅम्प अतिशय सुंदर दिसतो. त्यामुळे हा लॅम्प तुम्ही भेटवस्तू देण्यासाठी खरेदी करू शकता. हेही वाचा :  Diwali 2022: पुणेकरांना दिवाळीची ट्रिट, हे फटाके तुम्ही खाऊ देखील शकता! VIDEO याबासोबतच मिठाई सोबतच ड्रायफ्रूट सुद्धा तुम्ही देऊ शकता. सध्या मार्केटमध्ये ड्रायफूडचे विविध बॉक्स उपलब्ध असून 50 रुपयांपासून ते 300 रुपयापर्यंत विविध प्रकारचे ड्रायफूट बॉक्सेस तुम्ही खरेदी करू शकतात. या सर्व भेटवस्तू रविवार पेठ मधील विविध दुकानांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत. कुठे कराल खरेदी? रविवार पेठ पुणे

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: diwali , pune , shopping
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात