पुणे, 19 ऑक्टोबर : दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या कालावधीमध्ये फराळ, तसंच दिवाळी स्पेशल वस्तूंची खरेदी कुठे खरेदी करायचा असा प्रश्न सर्वांना पडतो. पुणेकरांना या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी महापालिकेनं मदत केली आहे. पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागातर्फे दिवाळी बचत बाजार प्रदर्शन आणि विक्री उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत बचत गटांतील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे दिवाळी निमित्त स्टॉल पुण्यातील पाच भागांमध्ये लावण्यात आले आहेत. या स्टॉलमधून पुणेकर दिवाळीच्या फराळासह वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी करू शकतात. महिलांना स्वयंरोजगाराला चालना मिळण्यासाठी बचत गट ही योजना गेल्या काही वर्षापासून सर्वत्र मोठ्या प्रमाणात काम करत आहे. याचाच एक भाग म्हणून पुणे महानगरपालिका समाज विकास विभागातर्फे पुण्यातील काही ठिकाणी बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे दिवाळीनिमित्त स्टॉल लावण्यात आले आहेत. महिलांना स्वयंरोजगारां सोबतच स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी यामुळे मदत होणार आहे. हेही वाचा : Diwali 2022: पुणेकरांना दिवाळीची ट्रिट, हे फटाके तुम्ही खाऊ देखील शकता! VIDEO कोणत्या पदार्थांचे स्टॉल? दिवाळीच्या निमित्त लागणारे फराळ, कपडे, सुगंधी उटणे विविध आकाराच्या पणत्या, आकाश कंदील, साजूक तूप, चकली भाजणी, चिवडायामध्ये दिवाळी फराळ व साहित्य : चकली, लाडू, करंजी, शंकरपाळी, अनारसे, शेव, चिवडा, रांगोळी, दीपमाळा, आकाशकंदिल, इतर खाद्यपदार्थ वांग्याचे भरीत, पिठलं भाकरी, मांडे, सॉस, शीतपेये, सोलकढी, लोणची, पापड़, वेगवेगळे मसाले, तयार पिठे, शेवया, कुरड्या, या व्यतिरिक्त बिर्याणी आणि इतर शाकाहारी तसंच मांसाहारी खाद्य पदार्थांचे विविध प्रकार, तसेच घरगुती वापरातील विविध वस्तू-लाकडी खेळणी, स्वेटर्स, तयार कपडे, फिनाईल, तोरण, लोखंडी तवे, आयुर्वेदिक उत्पादने, लेदर कापडी पिशव्या, कापडी फाईल, फोल्डर, पेपर प्रॉडक्टस, ज्वेलरी, सौंदर्य प्रसाधने, उदबत्ती अशा वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स यामध्ये आहेत. सर्व वस्तूंचे इथे अतिशय माफक दरामध्ये विक्री बचत गटांना मोठ्या प्रमाणावर प्रदर्शनाची गरज असते. एकाच छताखाली दिवाळीनिमित्त लागणाऱ्या सर्व वस्तूंचे इथे अतिशय माफक दरामध्ये विक्री होते आणि त्यातल्या सर्व वस्तू महिलांना सामूहिकरित्या या वस्तू बनवलेल्या असतात, असं बचत गटातील महिलांनी सांगितले. हेही वाचा : Diwali 2022 : दिवाळीत बनवा आजवर कधीही न खालेल्ला दळाचा लाडू, पाहा Recipe Video हे सर्व स्टॉल्स स्टॉल 21 ऑक्टोबर 2022 पर्यंत असणार असून सकाळी 11.00 ते रात्री 9.00 पर्यंत तुम्ही खरेदीला जावू शकतात. पुणे शहरातील 5 भागात हे स्टॉल असून पुणेकरांना दिवाळीची खरेदी करण्याचे हे 5 बेस्ट पर्याय आहेत. 1) पु. ल. देशपांडे उद्यान, सिंहगड रोड, 2) महिला आधार केंद्र, सर्व्हे नं. 137/1 मंगोलिया हौसिंग सोसायटी समोर, बाणेर-पाषाण लिंक रोड, पाषाण, 3)स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर क्रिडा मैदान, उजवी भुसारी कॉलनी, गल्ली नं.1 समोर कोथरूड 4) नविन भाजी मंडई, पुण्यनगरी शेजारी, स्टेलामेरी शाळेसमोर, वडगावशेरी, 5) कात्रज डेअरी मैदान, कात्रज,
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.