पुणे 04 नोव्हेंबर : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून नव्या सरकारने आधीच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर झालेल्या अनेक कामांना स्थगिती दिली आहे. आता चंद्रकांत पाटील यांनीही अजित पवारांना धक्का देत त्यांनी मंजूर केलेल्या बारामतीमधील कामांना कात्री लावली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या मार्फत मंजूर कामांना चंद्रकांत पाटील यांनी कात्री लावली आहे. भारत जोडो यात्रेसाठी तयारी; नाना पटोलेंसह या काँग्रेस नेत्यांचा पहाटेच चालण्याचा सराव, पाहा VIDEO यानंतर यावर प्रतिक्रिया देत अजित पवार यामुळे नाराज नसल्याचंही स्वतः पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. एकूण 303 कोटीच्या कामाला परवानगी देण्यात आली आहे. अजित पवार यांनी मंजूरी दिलेल्या बारामतीतील काही कामांना निधी देण्यात आलेला नाही. मात्र त्याने अजितदादा नाराज होणार नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, की ‘जिल्हा नियोजन समितीतून निधी वितरित न झाल्याने सुमारे 800 कोटीची कामं खोळंबली होती. त्यापैकी 303 कोटीच्या कामाला निधी देण्यात आला आहे. एखाद्या नेत्याने त्यांच्या काळातील आमदाराला थोडा निधी देऊन आपल्याकडे मोठा निधी ठेवला असेल तर तो निधी कमी करण्यात येईल. बारामतीच्या निधीलाही अजित पवार रागावतील इतकी कात्री लावलेली नाही. ते अस्वस्थ होतील किंवा रागावतील आणि नाराजी व्यक्त करतील इतकी कात्री निश्चितच लावलेली नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. ‘संजय शिरसाट आमच्या संपर्कात’, सुषमा अंधारेंचा पुनरुच्चार, दाव्यात कितपत तथ्य? बहुप्रतिक्षीत जिल्हा नियोजन समितीच्या कामांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी मान्यता दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 303 कोटींच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली. मात्र, यात माजी पालकमंत्री अजित पवार यांनी सुचवलेल्या कामांना कात्री लावण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.