बारामती, 26 नोव्हेंबर: पुणे (Pune) जिल्ह्याच्या बारामती (Baramati) तालुक्यातील सोनगाव याठिकाणी एक विचित्र घटना समोर आली आहे. पोलिसांच्या कारवाई पासून वाचण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीचा स्वत:च्याच चुकीमुळे जीव गेला आहे. हा संतापजनक प्रकार घडल्यानंतर, संतप्त जमावानं पोलिसांवर हल्ला (Attack on police) केला आहे. या हल्ल्यात तीन पोलीस कर्मचारी जखमी (3 police injured) झाले आहेत. दरम्यान गावातील परिस्थिती चिघळल्यामुळे पोलिसांनी अधिक कुमक मागवत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेचा पुढील तपास बारामती पोलीस करत आहेत.
मंगलेश अशोक भोसले असं मृत पावलेल्या 45 वर्षीय व्यक्तीचं नाव असून तो बारामती तालुक्यातील सोनगाव येथील रहिवासी आहे. मृत भोसले याचा अवैध दारुचा व्यवसाय होता. याबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर, बारामतीच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याच्या पथकानं संबंधित ठिकाणी अचानक धाड टाकली होती. पोलीस येत असल्याची माहिती मिळताच मृत मंगलेश भोसले याने पोलिसांच्या भीतीने घटनास्थळावरून धूम ठोकली.
हेही वाचा-सुट्टीच्या दिवशी चुकून क्लासला गेली अन्..; शिक्षकानं मुलीला दिली आयुष्यभराची जखम
पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी भोसले याने जवळच असणाऱ्या निरा नदीवरील बंधाऱ्यावरून पाण्यात उडी मारत (jump into Nira river to escape from police) पलीकडे जाण्याचा नदीच्या दुसऱ्या तीरावर पोहून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु धावत जाऊन उडी टाकल्याने पोहताना दम लागल्याने भोसले याचा पाण्यात बुडून मृत्यू (Death by drowning) झाला आहे. मंगलेश भोसलेच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या वस्तीवरील जमावाने पोलीस पथकावरच हल्ला केला आहे.
हेही वाचा-आठवीतील मुलीसोबत बापाचं घृणास्पद कृत्य; चिठ्ठी लिहून शिक्षकाकडे मागितली मदत
जमावानं केलेल्या हल्ल्यात तीन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे सोनगावातील परिस्थिती अधिकच चिघळली आहे. यानंतर पोलिसांनी ज्यादा कुमक मागवत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी बारामती पोलीस ठाण्यात अपघात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास बारामती पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Baramati, Crime news, Mumbai, Pune