मराठी बातम्या /बातम्या /देश /नात्याला काळिमा! आठवीतील मुलीसोबत बापाचं घृणास्पद कृत्य; चिठ्ठी लिहून शिक्षकाकडे मागितली मदत

नात्याला काळिमा! आठवीतील मुलीसोबत बापाचं घृणास्पद कृत्य; चिठ्ठी लिहून शिक्षकाकडे मागितली मदत

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

Father Raped Daughter: धैलापूर याठिकाणी रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथील एका बापानं आठवीत शिकणाऱ्या (8th grade minor student rape) आपल्या पोटच्या लेकीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

धौलपूर, 26 नोव्हेंबर: आपल्या लेकरावर एखादं संकट आलं तर बाप स्वत:ची पर्वा न करता, संकटाला सामोरं जातो. पण धैलापूर याठिकाणी रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथील एका बापानं आठवीत शिकणाऱ्या (8th grade minor student rape) आपल्या पोटच्या लेकीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून आरोपी पीडित मुलीला नरक यातना (Father raped minor daughter) देत होता. पीडित मुलीच्या आईनं अत्याचाराला विरोध केला असता, नराधम बाप दिला मारझोड करायचा.

आरोपी बापाच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीनं अखेर शाळेतील मुख्याध्यापकाला पत्र लिहून तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराची कहाणी सांगितली आहे. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर, शाळेच्या मुख्याध्यापकानं या घटनेची माहिती तात्काळ बाल कल्याण समितीला दिली आहे. पीडित मुलीच्या आरोपात तथ्य आढळल्यानंतर, बाल कल्याण समितीनं या घटनेची माहिती पोलिसांना दिली असून आरोपीवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित घटना राजस्थानच्या धौलपूर येथील आहे.

हेही वाचा-Cold Drink मध्ये गुंगीचं औषध टाकून पुण्यातील तरुणीवर बलात्कार, गुन्हा दाखल

पीडित मुलीनं केलेल्या आरोपीनुसार, तिचे वडील नेहमी तिच्यासोबत गैरवर्तन करून तिच्यावर बलात्कार करतात. या घटनेला आईनं विरोध केला असता, वडील तिलाही मारहाण करतात. यामुळे त्रस्त झालेल्या अल्पवयीन मुलीने शाळेच्या मुख्याध्यापकाला पत्र लिहून तक्रार केली. हे धक्कादायक प्रकरण समोर अल्यानंतर, बारी पोलीस ठाण्यात बलात्कारासह, विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचाराच्या कलमासह गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा- सुट्टीच्या दिवशी चुकून क्लासला गेली अन्...; शिक्षकानं अल्पवयीन मुलीला दिली आयुष्यभराची जखम

याबाबत अधिक माहिती देताना, धौलपूर बाल कल्याण समितीचे अध्यक्ष रवी पचौरी यांनी सांगितलं की, शाळेचे मुख्याध्यापक हरी ओम परमार यांनी त्यांना एक अर्ज दिला होता, ज्यामध्ये आठवीच्या विद्यार्थिनीनं तिच्या वडिलांवर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी बाल कल्याण समितीनं पीडित मुलीचं समुपदेशन केलं आहे. हे प्रकरण संवेदनशील असल्याचं आढळून आल्यानंतर बारी पोलीस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Crime news, Rajasthan, Rape on minor