मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

दौंड : राहते घर पाडण्यासाठी अचानक जेसीबी गावात, गावकरी संतापले, अधिकाऱ्यांना घेराव

दौंड : राहते घर पाडण्यासाठी अचानक जेसीबी गावात, गावकरी संतापले, अधिकाऱ्यांना घेराव

दौंड तालुक्यात पालखी महामार्गाच्या कामावेळी मोठा गोंधळ झाला. प्रशासनातील अधिकारी अचानक घर पाडण्यासाठी आल्याने नागरिकांना संताप आला.

  • Published by:  Chetan Patil
सुमित सोनवणे, दौंड, 22 सप्टेंबर : संत तुकाराम महाराज पालखी ज्या मार्गावरून जाते त्या मार्गावरील रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या पालखी महामार्गाच्या कामावेळी दौंड तालुक्यातील रोटी गावात मोठा गोंधळ उडाला. रस्ते मार्गासाठी गावातील काही ठिकाणी जमीन अधिग्रहण अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे प्रशासनातील अधिकारी पोलीस बंदोबस्तासह गावातील घरे पाडण्यासाठी दाखल झाले. पण आम्हाला सरकारकडून अद्याप मोबदला मिळालेला नसतानाही आम्ही राहतं घर सोडून जाणार कुठे? असा प्रश्न विचारत गावकऱ्यांनी प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला. पालखी महामार्गाच्या कामासाठी जमीन अधिग्रहण केलं जात असताना अनेक ठिकाणी नागरिकांकडून तक्रारी केल्या जात आहेत. "या महामार्गात आमचे राहते घर जाणार आहे. मात्र महसूल प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने घराचे मूल्यांकन केले होते. आम्ही केलेल्या तक्रारीनंतर प्रशासनाकडून पुनर्मूल्यांकन करण्यात आले. मात्र आम्हाला मोबदला म्हणून किती रक्कम दिली जाणार आहे, याची माहिती अद्याप प्रशासनाकडून देण्यात आलेलं नाही", असं म्हणत रोटी गावातील नागरिकांनी आपल्या तक्रारी मांडल्या आहेत. (उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला, मृतांचा आकडा 4 वर) मूल्यांकनानंतर मोबदला मिळणं तर दूरच मात्र नक्की किती मोबदला दिला जाणार आहे, याची रक्कमही आम्हाला सांगितलेली नाही. असं असताना आम्ही राहतं घर सोडून जाणार कुठे? असा प्रश्न या गावातील नागरिकांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना घेराव घालत विचारला. दरम्यान, नागरिकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर अखेर प्रशासनाने पाडकाम करणं थांबवून ही कारवाई स्थगित केली आहे. मात्र पालखी महामार्गात जाणाऱ्या आमच्या घर आणि जागेचे योग्य मूल्यांकन झाल्याशिवाय आणि त्याची रक्कम कळाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, अशी भूमिका बाधित गावकऱ्यांनी घेतली आहे.
First published:

Tags: Pune

पुढील बातम्या