मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला, मृतांचा आकडा 4 वर

उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला, मृतांचा आकडा 4 वर


उल्हासनगरमधील मानस टॉवर चार मजली इमारत आहे. या इमारतीचा स्लॅब कोसळला

उल्हासनगरमधील मानस टॉवर चार मजली इमारत आहे. या इमारतीचा स्लॅब कोसळला

उल्हासनगरमधील मानस टॉवर चार मजली इमारत आहे. या इमारतीचा स्लॅब कोसळला

उल्हासनगर, 22 सप्टेंबर : उल्हासनगर शहरात पुन्हा एकदा इमारतीचा स्लॅब कोसळला आहे. इमारतीचा स्लॅब दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ढिगार्‍याखाली आणखी काहीजण काहीजण अडकल्याची भीती वर्तवली जात आहे. उल्हासनगरमधील मानस टॉवर चार मजली इमारत आहे. या इमारतीचा स्लॅब कोसळला आहे. तीन दिवसातील स्लॅब कोसळल्याची दुसरी मोठी घटना आहे. या दुर्घटनेमध्ये 4  जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही या ठिकाणी ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. (वडिलांनी मारल्याने मुलगी प्रियकराच्या घरी, प्रियकराच्या कुटुंबीयांनी केलं भलतं) सध्या उल्हासनगर अग्निशमन दल ,पोलीस प्रशासनाच्या वतीने ढिगारा उपसण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मात्र सातत्याने या दुर्घटना होत असताना शहरातील धोकादायक आणि अति धोकादायक इमारतींवर तोडगा कधी निघणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. दौंडमधये पाडकामामुळे उडाला गोंधळ दरम्यान, दौंडमध्ये संत तुकाराम महाराज पालखी ज्या मार्गावरून जाते त्या मार्गावरील रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या पालखी महामार्गाच्या कामावेळी दौंड तालुक्यातील रोटी गावात मोठा गोंधळ उडाला. रस्ते मार्गासाठी गावातील काही ठिकाणी जमीन अधिग्रहण अद्याप पूर्ण झालेले नसताना प्रशासनातील अधिकारी पोलीस बंदोबस्तासह गावातील घरे पाडण्यासाठी दाखल झाले आम्हाला सरकारकडून अद्याप मोबदला मिळालेला नसतानाही आम्ही राहतं घर सोडून जाणार कुठे, असा प्रश्न विचारत गावकऱ्यांनी प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला. (Satara : 'लम्पी'मध्ये खासगी डॉक्टरांचे फावले, शेतकऱ्यांची सुरू आहे लूट! पाहा Video) पालखी महामार्गाच्या कामासाठी जमीन अधिग्रहण केलं जात असताना अनेक ठिकाणी नागरिकांकडून तक्रारी केल्या जात आहेत. 'या महामार्गात आमचे राहते घर जाणार आहे. मात्र महसूल प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने घराचे मूल्यांकन केले होते. आम्ही केलेल्या तक्रारीनंतर प्रशासनाकडून पुनर्मूल्यांकन करण्यात आले. मात्र आम्हाला मोबदला म्हणून किती रक्कम दिली जाणार आहे, याची माहिती अद्याप प्रशासनाकडून देण्यात आलेलं नाही,' असं म्हणत रोटी गावातील नागरिकांनी आपल्या तक्रारी मांडल्या आहेत.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या