पुणे, 15 नोव्हेंबर : सध्या कलर्स मराठी आणि हिंदीवर ‘ बिग बॉस ’ या रिअॅलिटी शो चा सिझन सुरू आहे. बिग बॉसच्या घरामधील नवीन टास्क, नॉमिनेशन, स्पर्धकांमधील परस्परांची केमिस्ट्री यामुळे हे दोन्ही सिझन चांगलेच लक्षवेधी ठरत आहेत. बिग बॉसचा हा सिझन सुरू असताना सर्वांनाच अभिजित बिचकुले यांची आठवण येणे साहजिक आहे. यापूर्वी त्यांनी हा सिझन गाजवलाय. अगदी मागच्या सिझनमध्येही त्यांची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली होती. सध्या सुरू असलेल्या बिग बॉसच्या सिझनबद्दल बिचुकले यांना काय वाटतं हे पाहूया… माझं लक्ष आहे! ‘मला कामाच्या व्यापामुळे बिग बॉस बघणे जमत नाही. मात्र बिग बॉसच्या घरामध्ये सध्या काय चाललंय, हे मी वेगवेगळ्या सोशल मीडियीच्या माध्यमातून फॉलो करतो, असं बिचुकुले यांनी सांगितलं. मराठी बिग बॉसपेक्षा हिंदी बिग बॉसवर त्यांचं विशेष लक्ष आहे. हिंदी बिग बॉसमध्ये सध्या अनेक गोष्टी घडत आहेत. यामधील सिमबुल ही सर्वात कमी वयाची स्पर्धक असली तरी ती चांगली खेळत आहे. अब्दु या विदेशी स्पर्धकाबद्दल उंची आणि स्वभावामुळे विशेष उत्सुकता आहे. मराठी बिग बॉस स्पर्धेचा यापूर्वीचा विजेता शिव ठाकरे सध्या हिंदीमध्ये आहे. तो माझा खूप चांगला मित्र आहे. तो माझ्याशी ऑन स्क्रिन आणि ऑफ स्क्रिन चांगला वागतो. त्याला माझ्याकडून शुभेच्छा, असं बिचुकले यांनी सांगितलं.
पुन्हा बिग बॉसमध्ये जाणार का? बिचुकुले यांनी मागील सिझनमध्ये वाईल्ड कार्डद्वारे एन्ट्री घेत धमाल उडवली होती. यंदाही आयोजकांनी संधी दिली तर मला जायला आवडेल. दोन्ही भाषेतील (मराठी आणि हिंदी) बिग बॉस सिझनला हवा असलेला तडका मी देईन. ‘तुमने पुकारा और हम चले आये,’ असं म्हणतं त्यांनी वाईल्ड कार्डद्वारे पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी तयार असल्याचं स्पष्ट केलं. बिग बॉसमुळे लव्हबर्ड्सच्या नात्याला तडा? घरातून बाहेर पडताच रुचिरानं केलं रोहितला अनफॉलो अभिजीत बिचुकले सध्या काय करतात? निवडणुका ते बिग बॉसपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून चर्चेत असलेले बिचकुले यांनी सध्या त्यांचं लक्ष व्यवसायावर केंद्रीत केले आहे. त्यांनी पुण्यात नुकतेच साताऱ्याच्या कंदीपेढ्याचे आऊटलेट सुरू केले आहे. त्याचबरोबर आपण लवकरच एका नवीन प्रोजेक्टसह सर्वांसाठी काहीतरी महत्त्वाचं घेऊन येणार आहोत, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.