मुंबई, 11 नोव्हेंबर : बिग बॉस मराठीच्या घरातून दर आठवड्याला सदस्य आऊट होत आहेत. मागच्या चावडीला अभिनेत्री रुचिरा जाधवला घरातून एक्झिट घ्यावी लागली. रोहितबरोबर रुचिरानं घरात एंट्री घेतली. रोहित आणि रुचिरा ही बिग बॉस मधील पहिली कपल एंट्री होती. दोघांच्या एंट्रीनं सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. दोघांनी बिग बॉसच्या घरात आपापल्या पद्धतीनं गेम खेळला. कधी एकत्र स्ट्रॅटेजी आखल्या तर वेळ प्रसंगी एकमेकांना आधार दिला. खेळात देखील रोहित रुचिरा एकमेकांना चिअरअप करताना दिसले. दोघांची चांगली केमिस्ट्री प्रेक्षकांना पााहायला मिळाली. मात्र शेवटच्या दिसता दोघांमध्ये भांडणं झाली आणि त्याच दिवशी रुचिराला घराबाहेर पडावं लागलं. घरातून बाहेर पडल्यानंतर आता खरा खेळ सुरू झाला आहे का असं म्हणण्याची वेळ आहे का? असा प्रश्न दोघांच्या चाहत्यांना पडला आहे. कारण घराबाहेर पडताच रुचिरानं रोहितला अनफॉलो केल्याचं दिसत आहे. रुचिरा आणि रोहित गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांच्या घरच्यांना आणि आता सगळ्या चाहत्यांना देखील त्यांच्या नात्याविषयी कळलं आहे. पण बिग बॉसमध्ये जाताच दोघांच्या नात्याला तडा गेल्याचं म्हटलं जात आहे. रोहित आणि रुचिरा सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय आहेत. दोघांची केमिस्ट्री दाखवणारे अनेक फोटो आणि व्हिडीओ तिथे पाहायला मिळतात. अशातच आता बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच रुचिरानं रोहितला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याचं पाहायला मिळत आहे. हेही वाचा -
Bigg Boss Marathi 4: बिग बॉसमधील जोडी तुटली! रुचिराला निरोप देताना रोहितला अश्रू अनावर
रुचिराच्या इन्स्टाग्रामवर रोहित रुचिराला फॉलो करतोय. पण रुचिरा मात्र रेहितला फॉलो करत नाहीये. पण दोघांच्या अकाऊंटवर एकमेकांचे फोटो आणि रील्स व्हिडीओ पाहायला मिळत आहेत. मात्र इन्स्टाग्रामवर रुचिरानं रोहितला अनफॉलो केल्याचं पाहून चाहत्यांना अनेक प्रश्न पडले आहेत.
बिग बॉसच्या घरात उडालेले खटके हे रोहित आणि रुचिराच्या नात्याला तडा देणार की रोहित बाहेर आल्यानंतर दोघांचं पहिल्यासारखं दिसणार हे रोहित घराबाहेर आल्यानंतरच कळणार आहे.
तर काही चाहत्यांनी सोशल मीडियावर रुचिरा रोहितला फॉलोच करत नव्हती. तसंच ती तिच्या फॅमिलीमधील कोणत्याच मेंबरलाही फॉलो करत नव्हती ्असं म्हटलं आहे.
बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर रुचिराशी संवाद साधला असता ती म्हणाली, ‘रोहित आणि मी घरात इंडिविज्युअल खेळत होतो. घरात मी नेहमीच त्याचा विचार करत होते. मी माझे बेस्ट देण्याचा प्रयत्न केला. गेम आणि प्रेम याच्यात रुचिरानं गल्लत केली नाही. तिनं प्रेमात गेम केला नाही पण गेममध्ये प्रेम जपलं. या दोन गोष्टी मी वेगळ्या ठेवल्या. काही गोष्टी मी बोलून सॉल करेन. आता मला माझ्यासाठी मी महत्त्वाची आहे. माझी प्रायोरिटी क्लिअर आहे. माझी प्रयोरिटी मी आहे. मला स्वत:ला जपायचं आहे’.