जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Chandrakant Patil : टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रातून गेलाय? चंद्रकांत पाटलांचा पत्रकारांनाच उलट सवाल

Chandrakant Patil : टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रातून गेलाय? चंद्रकांत पाटलांचा पत्रकारांनाच उलट सवाल

Chandrakant Patil : टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रातून गेलाय? चंद्रकांत पाटलांचा पत्रकारांनाच उलट सवाल

चंद्रकांत पाटील यांनी टाटा आणि एअरबस या कंपनीचा प्रोजेक्ट गुजरातच्या बडोद्याला गेल्याचे बोलणे टाळले.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 28 ऑक्टोबर : मागच्या  काही दिवसांपूर्वी वेदांता फॉक्सकॉन ही कंपनी महाराष्ट्रातून गुजरातला हलवण्यात आली. त्यानंतर अवघ्या काही दिवसांत फोन पे ही कंपनीही मुंबईतून आपले ऑफिस बंगळुरूला हलवण्याचा निर्णय घेतला यावरून राजकारण राज्यातील विरोध पक्षांकडून सरकारला जाब विचारत असतानाच आता आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून गेल्याचं समोर येत आहे. टाटा आणि एअरबस या कंपनीचा प्रोजेक्ट गुजरातच्या बडोद्यामध्ये गेला आहे. यावरून राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारणा केली असता त्यांना याबात काही माहिती नसल्याचे त्यांनी उत्तर दिलं आहे.

जाहिरात

चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रीया दिली यावेळी ते म्हणाले की, मला याबाबत काही माहिती नाही. मला माध्यमांकडूनच याबाबतची माहिती मिळत आहे. मी याची सविस्तर माहिती घेतो आणि तुम्हाला कळवतो असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी टाटा आणि एअरबस या कंपनीचा प्रोजेक्ट गुजरातच्या बडोद्याला गेल्याचे बोलणे टाळले. दरम्यान विरोधकांनी यावर जोरदार रान उठवलं आहे. युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विरोधकांना याचा जाब विचारला आहे. तर राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला आहे.

हे ही वाचा :  ‘खोके सरकारने आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर घालवला’, आदित्य ठाकरेंचा प्रहार

काय आहे C-295 प्रकल्प?

56 विमानांच्या निर्मितीसाठी करार

21 हजार कोटींचा सामंजस्य करार

AVRO-748 ची जागा C-295 विमानं घेणार

भारत सरकार आणि एअरबसमध्ये करार

पहिली 16 विमानं पुढच्या 4 वर्षांमध्ये मिळणार

40 विमानांची निर्मिती करणार

टाटा ऍडव्हान्स सिस्टीम निर्मिती करणार

एअरबस युरोपमधील विमान निर्मिती कंपनी

 हे ही वाचा :  शिंदे सरकारची मेगा पोलीस भरती, 14 हजार 956 जागांच्या पोलीस भरतीची निघाली जाहिरात

जाहिरात

राष्ट्रवादीने मागितला मुख्यमंत्र्यांचा राजीनामा

‘वेदांत फॉक्सकॉनमधून बाहेर पडल्यानंतर सी-२९५ मिलिटरी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट तयार करण्याचा टाटा एअरबसचा प्रकल्प नागपुरात येईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले होते. मात्र एकनाथ शिंदे यांची खोटी भूमिका आता सर्वांसमोर उघडी पडलेली आहे. महाराष्ट्रातून मेगा प्रकल्प गुजरातला हस्तांतरीत करण्यासाठीच भाजपने शिंदेना मुख्यमंत्री पदावर बसवले आहे. एकनाथ शिंदे यांनीही लिज ट्रस यांच्याप्रमाणे राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात