जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'न्याय मागून मिळणार नसेल तर कानफाडात खेचून..'; खासदार ओमराजेंचा सरकारला अल्टीमेटम

'न्याय मागून मिळणार नसेल तर कानफाडात खेचून..'; खासदार ओमराजेंचा सरकारला अल्टीमेटम

'न्याय मागून मिळणार नसेल तर कानफाडात खेचून..'; खासदार ओमराजेंचा सरकारला अल्टीमेटम

शेतकऱ्यांना पीकविमा आणि अनुदानाचे पैसे मिळावे, या मागणीसाठीचे शेतकऱ्यांचे आंदोलन पेटताना दिसत आहे. अशात आता खासदार ओमराजे यांनी आता सरकारला अल्टीमेटम दिला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

उस्मानाबाद 28 ऑक्टोबर : खासदार ओमराजे निंबाळकर रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांना पीकविमा आणि अनुदानाचे पैसे मिळावे, या मागणीसाठीचे शेतकऱ्यांचे आंदोलन पेटताना दिसत आहे. अशात आता खासदार ओमराजे यांनी आता सरकारला अल्टीमेटम दिला आहे. अजून वेळ गेली नाही, असा इशारा खासदार ओमराजे निंबाळकर यांनी राज्य सरकार आणि प्रशासनाला दिला आहे. ‘शिळ्या कढीला उकळी कशाला?’, टाटा-एअरबस प्रकल्पावरून उद्योगमंत्र्यांचा राष्ट्रवादीवर पलटवार शेतकऱ्यांच्या हक्काचे पीक विम्याचे पैसे 4 दिवस आमरण उपोषण करूनही मिळाले नाही. 4 दिवस संयमाने आंदोलन केले मात्र तरीही न्याय मागून मिळणार नसेल तर कानफाडात खेचून न्याय घयावा लागेल याची आठवण मी कार्यकर्ते यांना करुन देतो, असं ओमराजे निंबाळकर यावेळी म्हणाले. यापुढे प्रशासनाने दक्ष राहावे कारण आंदोलनामुळे वाईट परिणाम भोगावे लागतील. कायदा सुव्यवस्थित बिघडली जाणार नाही याची काळजी घ्या, असे सांगत खासदार ओमराजे यांनी सरकारला अल्टीमेटम दिला आहे. आमदार कैलास पाटील यांची प्रकृती खालवली असली तरीदेखील ते आंदोलनावर ठाम आहेत, असंही त्यांनी सांगितलं. ‘खोके सरकारने आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर घालवला’, आदित्य ठाकरेंचा प्रहार कैलास पाटील यांच्या समर्थनात उस्मानाबादमध्ये शेतकऱ्यांनी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी आंदोलन केले आहे. शेतकऱ्यांना विमा, अतिवृष्टी अनुदान मिळावे या मागणीसाठी एकीकडे आमदार कैलास पाटील यांचे आमरण उपोषण सुरु आहे तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर हे आक्रमक झाले आहेत. खासदार ओमराजे यांनीही रस्त्यावर उतरत सोलापूर औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गांवर चक्का जाम केला होता. आता त्यांनी सरकारला अल्टीमेटमही दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात