जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीतील धक्कादायक प्रकार, पत्नीच्या मित्राला धारदार शस्त्राने भोसकलं अन्...

पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीतील धक्कादायक प्रकार, पत्नीच्या मित्राला धारदार शस्त्राने भोसकलं अन्...

पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीतील धक्कादायक प्रकार, पत्नीच्या मित्राला धारदार शस्त्राने भोसकलं अन्...

एका कम्प्युटर इंजिनिअरने पत्नीच्या मित्राला दहाव्या मजल्यावरून फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 28 ऑक्टोबर : एका विकृताने त्याच्या पत्नीचा मित्र निलेश जोर्वेकरचा खून केल्या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पंकजला अटक केली आहे. पंकजला त्याची पत्नी आणि मृत निलेशसोबत अनेक दिवसांपासून अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्यामुळे त्याने आपल्या पत्नीवर पाळत ठेवली आणि दिवाळी निमित्त गावाकडे गेलेला निलेश एकदिवस आधीच घरी पोचला आणि पत्नी सोबत असलेल्या मित्राला घरात बघून त्याचा पारा चढला आणि पुढच्या काही क्षणातचं दहाव्या मजल्यावरून पडून निलेशचा मृत्यू झाला. या घटनेत मृत पावलेला निलेश इमारतीवरून खाली कोसळ्याल्या नंतर आरोपी पंकज आपल्या मुलीला घेऊन लिफ्टने खाली उतरला निलेश मयत झाल्याचं त्याने बघितलं आणि तो परत फ्लॅटमध्ये गेला, ही बाब पोलिसांना कळाली आणि त्यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन पंकजला ताब्यात घेतलं पोलिसांनी व्यक्त केलेल्या अंदाजा नुसार आरोपी पंकजने मयत निलेशला आधी धारदार शस्त्राने भोसकलं आणि मग बाल्कनीतून खाली फेकलं. मात्र जर पंकजने निलेशवर वार केले होते तर त्याच्या रक्ताचे डाग घरात आढळून यायला हवे होते, पण घरात कुठेही रक्त सांडल्याच दिसून न आल्याने आता पोलीसही चक्रावून गेले आहेत. निलेश खाली पडून मृत पावला की त्याच्यावर वार करून त्याला मारून खाली फेकण्यात आलं, याचा उलगडा करण्याच मोठं आवाहन पोलिसांसमोर उभं ठाकलं आहे.

Pune : आईसोबत नदीला गेला ते परत आलाच नाही, पुण्यातील धक्कादायक प्रकार

सुशिक्षित असो किंवा अशिक्षित…मात्र पत्नी, पत्नीमध्ये तिसरा कुणी तरी आला की त्या गोष्टीचा शेवट असाच होत असल्याचे अनेक उदाहरण या आधीही घडली आहेत. या प्रकरणात निलेश नावाच्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर आरोपी पंकजवर पुढील अनेक वर्ष जेलच्या काळया कोठडीत व्यतीत करण्याची वेळ आली आहे. तर दुसरीकडे पंकजची मुलगी आणि पत्नीचं आयुष्य उघड्यावर पडलं आहे. त्यामुळे क्षणिक रागातून केलेल्या अशा गुन्हेगारी कृत्यामुळे किती जणांची भविष्य उध्वस्त होतात, हे असं कृत्य करू पाहणाऱ्या प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात