रायचंद शिंदे (पुणे) 26 ऑक्टोबर : मागच्या काही दिवसांपूर्वी परतीच्या पावसाने पुणे जिल्ह्यात थैमान घातले होते. यामुळे नदी, ओढे, नाल्यांना पाणी भरपूर असल्याने पाण्याचा प्रवाह जोरात असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान शिरूर तालुक्यात पडलेल्या पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. अशातच कुकडी नदीवर आईसोबत कपडे धुण्यासाठी गेलेला मुलगा बुडल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने मुलगा वाहून गेल्याने अद्यापही त्याचा शोध लागला नाही.
शिरूर तालुक्यात म्हसे बुद्रुक येथे कुकडी नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेला बारा वर्षीय मुलगा बुडाल्याने खळबळ उडाली आहे. अक्षय गायकवाड असं या मुलाचे नाव आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने या मुलाचा शोध सुरू असून NDRF च्या जवानांना पाचारण करण्यात आले आहे.
हे ही वाचा : पत्नी माहेरी गेल्याचं शेजाऱ्यांना सांगायचा; एका महिन्याने झाला हादरवणारा खुलासा, घरामागे दिसलं भयानक दृश्य
NDRF च्या मदतीने या मुलाचा आज शोध घेतला जाणार असून आई नदिवरती कपडे धुत असताना पाण्यात खेळत असताना अक्षयचा पाय घसरून तो वाहत्या पाण्यात पडल्याने आणि पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने शोधण्यात अडथळे येत आहेत.
घरफोडी करणाऱ्या मध्यप्रदेशमधील टोळीला पुण्यात अटक
राज्यभरातील अनेक शहरांमध्ये चोरीच्या अनेक घटना दररोज घडतात. मात्र, यातील काही चोरांची चोरी करण्याची पद्धत इतकी वेगळी असते, की ती चर्चेचा विषय ठरते. नुकतंच पुण्यातून अशाच एका आंतरराज्यीय टोळीचा भांडाफोड झाला आहे. बाणेर परिसरात 10 पेक्षा जास्त घरफोड्या करणाऱ्या या टोळीला चतुःश्रृंगी पोलिसांनी जेरबंद केलं आहे.
हे ही वाचा : लक्ष्मीपूजनासाठीचं साहित्य, घराबाहेर दागिने, चिठ्ठी अन् मायलेकीचा पंख्याला लटकलेला मृतदेह; अमरावतीत खळबळ
याप्रकरणी अटक करण्यात आलेले सर्व आरोपी हे मध्यप्रदेशातील असल्याचं समोर आलं आहे. ही टोळी पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीमध्ये चोरी करायची. यांची चोरी करण्याची पद्धत अतिशय वेगळी होती. हे चोरटे नदीपात्रालगत असलेल्या सोसायटीच्या परिसरात थांबत असत. यावेळी मच्छर चावू नये यासाठी ते अंगाला लोशन लावत असत. यासोबतच आपल्याला कोणी ओळखावं नाही, यासाठी ते अंगाला चिखलही लावत असे.