पुणे, 19 ऑक्टोबर : पुण्यात परतीच्या पावसामुळे हाहाकार उडाला होता. अनेक भागात पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. याच मुद्यावरून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला होता. तर भाजपचे नेते मुरलीधर मोहोळ यांनी राष्ट्रवादीच्या कामाच्या पाढा वाचून दाखवत टीकास्त्र सोडले आहे. पुण्यात पावसामुळे पाणी साचल्यामुळे पुणेकरांचे पुरते हाल झाले आहे. तर दुसरीकडे राजकीय आखाडा तापला आहे. भाजपचे नेते आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीट करून अजितदादांना प्रत्युत्तर दिले आहे. पुण्याच्या पावसावरून अजित पवारांनी केलेल्या उद्विग्न टीकेनंतर मुरलीधर मोहोळ यांनी थेट अजित पवारांनाच प्रश्न विचारलेत.
आदरणीय दादा,
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) October 18, 2022
बांधलेले उड्डाणपूल का पाडावे लागले?
आंबिल ओढा दुर्घटनेतील बळींना जबाबदार कोण?
PMPML का खिळखिळी झाली?
सार्वजनिक वाहतुकीचा बोजवारा का उडाला?
मेट्रो दहा वर्षें कागदावर कोणी ठेवली?
कचऱ्याची समस्या का झाली?
BRT बळींचं पाप कोणाचं?
या प्रश्नांची उत्तरे पुणेकरांकडे आहे! pic.twitter.com/b8IsLeG0S4
आदरणीय दादा, बांधलेले उड्डाणपूल का पाडावे लागले?आंबिल ओढा दुर्घटनेतील बळींना जबाबदार कोण PMPML का खिळखिळी झाली? सार्वजनिक वाहतुकीचा बोजवारा का उडाला? मेट्रो दहा वर्षें कागदावर कोणी ठेवली? कचऱ्याची समस्या का झाली? BRT बळींचं पाप कोणाचं? असे प्रश्नच मोहोळ यांनी अजितदादांना विचारले. (पुण्यातील सध्याचा पाऊस फक्त ट्रेलर! ‘पिक्चर अभी बाकी है’, Video) दरम्यान, पावसाने दगडूशेठ गणपती मंदिर सुध्दा पाण्यात गेलं होतं. शहरातल्या जवळपास 10 ठिकाणी घरांमध्ये सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये पाणी शिरलं होतं. काही ठिकाणी वाहने पाण्यात वाहून गेली होती. या सगळ्याची जबाबदारी कुणाची असा प्रश्न निर्माण झाल्यावर आता भाजप राष्ट्रवादीमध्ये जोरदार जुंपली आहे. भाजपवर अत्यंत संतापून अजित पवार यांनी जोरदार टीका केली आहे. ( मध्यरात्रीपर्यंत सुरू होतं पावसाचं थैमान, गाड्या पाण्यात वाहत होत्या, पुण्याचे 5 धक्कादायक VIDEO ) भाजपने ही या पावसासाठी प्रशासनाला जबाबदार धरलं. सोबतच राष्ट्रवादी आणि काँग्रेसने 50 वर्ष जो गोंधळ घातला होता तो 5 वर्षात कसा नीट होणार, असा प्रतिप्रश्न ही राष्ट्रवादीला विचारला गेला आहे. प्रशासनाने मात्र खुलासा करताना १८८२ च्या ॲाक्टोबर महिन्यात एवढा पाऊस झाल्यानंतर आताच एवढा पाऊस झाल्याची नोंद असल्याच म्हटलं आहे. आणि पुण्यात पावसाच पाणी वाहून नेण्याची क्षमता असलेली गटारं ही ६५ मिलीमीटर इतका पाऊस वाहून नेण्याच्या क्षमतेची आहेत. त्यासाठी गेल्या १०० वर्षाच्या पावसाच्या नोंदी विचारात घेतल्या असल्याच आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे.