जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मध्यरात्रीपर्यंत सुरू होतं पावसाचं थैमान, गाड्या पाण्यात वाहत होत्या, पुण्याचे 5 धक्कादायक VIDEO

मध्यरात्रीपर्यंत सुरू होतं पावसाचं थैमान, गाड्या पाण्यात वाहत होत्या, पुण्याचे 5 धक्कादायक VIDEO

मध्यरात्रीपर्यंत सुरू होतं पावसाचं थैमान, गाड्या पाण्यात वाहत होत्या, पुण्याचे 5 धक्कादायक VIDEO

पुणे, 18 ऑक्टोबर : राज्यभरात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. पुण्यात सोमवारी पावसाने अक्षरश: हैदोस घातला होता. ठिकठिकाणी पावसामुळे पाणी साचले होते. अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे गाड्या वाहून गेल्या. तर दगडूशेठ हलवाई मंदिरातही पाणी शिरले असल्याचे समोर आले आहे. राज्यात सध्या सर्वत्र परतीच्या पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळतोय आणि या परतीच्या पावसाचा फटका पुणे शहरालादेखील बसला. सोमवारी रात्री नारायण पेठ, सदाशिव पेठ, स्वारगेट, नवी पेठ यासह कात्रज, कोंढवा, कर्वेनगर या उपनगरात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 18 ऑक्टोबर : राज्यभरात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. पुण्यात सोमवारी पावसाने अक्षरश: हैदोस घातला होता. ठिकठिकाणी पावसामुळे पाणी साचले होते. अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे गाड्या वाहून गेल्या. तर दगडूशेठ हलवाई मंदिरातही पाणी शिरले असल्याचे समोर आले आहे. राज्यात सध्या सर्वत्र परतीच्या पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळतोय आणि या परतीच्या पावसाचा फटका पुणे शहरालादेखील बसला. सोमवारी रात्री नारायण पेठ, सदाशिव पेठ, स्वारगेट, नवी पेठ यासह कात्रज, कोंढवा, कर्वेनगर या उपनगरात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. बिबवेवाडी परिसरात तर ढगफुटी सारखा पाऊस झाला. पुण्यात अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांच स्वरुप आल्याचं पाहायला मिळालं. दगडूशेठ मंदिरात देखील पाणी शिरलं.

जाहिरात

पावसाच्या धुमाकुळामुळे जनजीवन विस्कळीत झालं आणि नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. कोंढवा खुर्द भाजी मंडई, मंगळवार पेठ आणि सदाआनंदनगरमधून साचलेल्या पाण्यातून 12 जणांची सुटका करण्यात आली. दरम्यान, पुण्यात आज आणि उद्याही गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता, हवामान खात्याने वर्तवली आहे.

दरम्यान, पहाटे 4 वाजेपर्यंत पाणी शिरणे किंवा जमा होणे याच्या एकूण 20 (येवलेवाडी स्मशानभूमीजवळ - सुखसागर नगर, अंबामाता मंदिर - कोंढवा खुर्द, एनआयबीएम रोड - रास्ता पेठ, दारुवाला पुलाजवळ - सुखसागर नगर, डॉल्फिन चौक - बी टी कवडे रोड अग्निशमन केंद्र समोर - हडपसर, गाडीतळ - शिवाजीनगर पोलिस मुख्यालय - मंगळवार पेठ, शिवाजी स्टेडियम - कसबा पेठ, फिश मार्केट जवळ - कुंभार वाडा समोर - नारायण पेठ, मोदी गणपती - औंध, डिएव्ही स्कुल गल्ली - कसबा पेठ, पवळे चौक - कसबा पेठ, भुतडा निवास - पर्वती, मिञमंडळ चौक - गंज पेठ - भवानी पेठ तसंच ०१ ठिकाणी सीमा भिंतीचा भाग पडल्याची घटना घडली. (पुण्यात परतीच्या पावसाचा हाहाकार, बिबवेवाडीत ढगफुटीसारखा पाऊस, VIDEO) पर्वती, रमणा गणपतीजवळ घडली. तसेच झाडपडी ०३ ठिकाणी ज्यामधे हडपसर, आकाशवाणी जवळ रस्त्यावर तर चंदननगर, बिडी कामगार वसाहत येथे रिक्षावर झाड पडले आणि पाषाण, लोयला स्कुल येथे दुचाकीवर झाड पडले होते. यामध्ये दलाची मदत पोहोचण्यापूर्वी जखमी झालेल्या दुचाकीस्वाराला नागरिकांनी दवाखान्यात रवाना केले होते. (Weather Alert : राज्यात तुफान बरसणार, मुंबईसह या जिल्ह्यांना पुढचे 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा) कोंढवा खुर्द भाजी मंडई लगत एका ठिकाणी ०७ नागरिक पाण्यामध्ये अडकले होते. या सर्व ०७ सुखरुप बाहेर काढण्यासाठी रश्शीचा वापर करून पाण्यामध्ये जात कोंढवा खुर्द अग्निशमन जवान निलेश लोणकर, रवि बारटक्के, नारायण मिसाळ, सुरज माळवदकर, सागर इंगळे, अनिकेत गोगावले व चालक दिपक कचरे यांनी ही उत्तम कामगिरी केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात