मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /उठता बसता पत्नीकडून सुरू होता छळ; पुण्यातील तरुणानं केला हृदयद्रावक शेवट

उठता बसता पत्नीकडून सुरू होता छळ; पुण्यातील तरुणानं केला हृदयद्रावक शेवट

Suicide in Pune: पुण्यातील लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका 32 वर्षीय तरुणानं पत्नीच्या त्रासाला कंटाळून आपल्या आयुष्याचा हृदयद्रावक शेवट केला आहे.

Suicide in Pune: पुण्यातील लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका 32 वर्षीय तरुणानं पत्नीच्या त्रासाला कंटाळून आपल्या आयुष्याचा हृदयद्रावक शेवट केला आहे.

Suicide in Pune: पुण्यातील लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका 32 वर्षीय तरुणानं पत्नीच्या त्रासाला कंटाळून आपल्या आयुष्याचा हृदयद्रावक शेवट केला आहे.

पुणे, 08 डिसेंबर:  पुण्यातील लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका 32 वर्षीय तरुणानं पत्नीच्या त्रासाला (32 years old young man persecuted by wife) कंटाळून आपल्या आयुष्याचा हृदयद्रावक शेवट केला आहे. संबंधित तरुणानं आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या (husband suicide) केली आहे. गेल्या महिन्यात घडलेल्या या घटनेनंतर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पण घटनेच्या एक महिन्यानंतर मृत तरुणानं लिहिलेली सुसाईड नोट (Suicide note found) सापडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पत्नीविरोधात गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे.

महावीर उत्तम जगदाळे असं आत्महत्या केलेल्या 32 वर्षीय तरुणाचं नाव असून तो पुण्यातील लोणी काळभोर परिसरात आपली पत्नी आणि दोन मुलांसह वास्तव्याला होता. मृत तरुणाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पत्नी रजनी महावीर जगदाळे हिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महावीर आणि रजनी याचं आठ वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. लग्नानंतर त्यांना दोन मुलंही झाली आहेत. दोघंही पती पत्नी मोल मजुरी करून आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालवत होते.

हेही वाचा-नगर हादरलं! कॉलेजच्या गेटसमोरून केलं अपहरण; बळजबरीनं लग्न लावत युवतीवर बलात्कार

पत्नी देखील एका बांधकाम साईटवर काम करत होती. पण लॉकडाऊनच्या काळात पतीचं काम बंद झाल्यामुळे तो गावी निघून गेला होता. गावावरून परत आल्यानंतरही तो कामावर जात नव्हता. गेली काही  दिवस तो घरीच बसून होता. यामुळे रजनी यांनी आपल्या पतीची तक्रार सासऱ्यांकडे केली. समजूत घातल्यानंतरही मृत महावीर कामाला जात नव्हता. यामुळे पती पत्नीत वाद होऊ लागले होते.

हेही वाचा-महिलेला मधलं बोट दाखवणाऱ्या तरुणाला कोर्टानं घडवली अद्दल, सुनावली मोठी शिक्षा

अनेक छोट्या छोट्या कारणातून दोघांमध्ये वाद होऊ लागले होते. यातून पत्नी उठता बसता आपल्या पतीला टोमणे मारू लागली. आरोपी पत्नीच्या त्रासाला कंटाळून महावीर याने 8 नोव्हेंबर रोजी  आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना सापडली असून त्यामुळे बायकोच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं लिहिलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

First published:

Tags: Crime news, Husband suicide, Pune