मुंबई, 08 डिसेंबर: ट्रॅफिक सिग्नलवर झालेल्या वादातून (Hassle at traffic signal) एका महिलेला मधलं बोटं दाखवून शिवीगाळ (Show middle finger and abused) करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. दंडाधिकारी न्यायालयानं वरळी येथील 31 वर्षीय तरुणाला आयुष्यभराची अद्दल घडवली आहे. न्यायालयाने तरुणाला दोषी ठरवत 6 महिन्यांचा तुरुंगवास आणि एक हजार रुपयांचा दंड (6 months jail and 1000 rs fine) ठोठावला आहे. दोषी तरुणानं पीडित महिलेच्या 'सन्मानाने जगण्याच्या अधिकारा'वर हल्ला केल्याचं निरीक्षण न्यायालयाने यावेळी नोंदवलं आहे. तसेच माफीनामा लिहून तरुणाची सुटका करण्याला देखील न्यायालयाने विरोध केला आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
संबंधित घटना 17 सप्टेंबर 2018 साली घडली आहे. घटनेच्या दिवशी 66 वर्षीय पीडित महिला आणि त्यांचा मुलगा आपल्या कारने ऑफिसला जात होते. पावणे बाराच्या सुमारास ते कॅडबरी जंक्शन याठिकाणी आले असता, त्यांच्या डाव्या बाजूने एक लाल रंगाची कार आली. संबंधित कारचालकाने मध्येच कार घुसवल्याने फिर्यादी महिलेला डिव्हाडरच्या बाजूला खेटावं लागलं. जवळपास 100 मिटर हा प्रकार असाच सुरू होता.
हेही वाचा-फ्लॅट पाहण्याच्या बहाण्यानं मित्रानंच साधला डाव; ब्रोकर महिलेवर बलात्कार
त्यानंतर एका सिग्नलला कार थांबवली असता, आरोपी कारचालक फिर्यादी महिलेला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असल्याचं फिर्यादीच्या निदर्शनास आलं. पुढच्याच क्षणात आरोपीनं पीडित महिलेच्या डाव्या बाजूने आपली कार पुढे घेतली. तसेच कारची काच खाली घेत त्याने पीडित महिलेला आणि त्यांच्या मुलाला मधलं बोट दाखवून शिवीगाळ केली. पीडित महिलेनं आपल्या मुलाला शांत राहण्याचा सल्ला दिला. पण आरोपीनं महिलेला पुन्हा शिवीगाळ केली. हा वाद वाढल्यानंतर पीडित महिलेच्या मुलानं स्वत:ची कार आरोपीच्या कारसमोर लावून संपूर्ण रस्ता रोखला.
हेही वाचा-'बर्थ डे' पार्टीला बोलावून पाजली दारू; पुण्यातील तरुणीवर तळजाई जंगलात बलात्कार
यामुळे त्याठिकाणी आलेल्या वाहतूक पोलिसांनी दोघांनाही गामदेवी पोलीस ठाण्यात नेलं. याठिकाणी फिर्यादी महिलेनं 31 वर्षीय आरोपी विरोधात फिर्याद दाखल केली. 2018 पासून सुरू असलेल्या सुनावणीनंतर, न्यायधीशांनी दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर, आरोपीला सहा महिन्यांचा तुरुंगवास आणि 1000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. माफीनामा लिहून घेऊन तरुणाची सुटका करण्याबाबत झालेल्या युक्तीवादाला न्यायालयाने विरोध केला आहे. तरुणाची अशाप्रकारे सुटका केल्यास समाजात चुकीचा संदेश जाऊ शकतो. दोषी तरुणानं पीडित महिलेच्या 'सन्मानाने जगण्याच्या अधिकारावर हल्ला केल्याचंही कोर्टानं यावेळी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Court, Crime news, Mumbai