पुणे, 8 जुलै : पुणे जिल्ह्यातून एक वाईट बातमी समोर आली आहे. बारामती (Baramati) तालुक्यात एका 20 वर्षीय तरुणीचा सर्पदंशाने मृत्यू (Sneke bite) झाला आहे. कोमल अजित तांबे (वय 20) असे या मृत तरुणीचे नाव आहे. (Young Married Woman Death due to Snake Bite) ही घटना बारामती तालुक्यातील तरडोली नजीक तुकाईनगर गावात घडली.
कोमल अजित तांबे ही विवाहित तरुणी आपल्या राहत्या घरासमोरील अंगणात घरकाम करत होती. याचवेळी एक दुर्दैवी घटना घडली. ती आपल्या अंगणात घरकाम करत असताना तिला सर्पदंश झाला. यानंतर तिला लगेचच मोरगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्राथमिक उपचार केल्यानंतर कोमलची प्रकृती जास्तच ढासळत चालली होती. यामुळे तिला अधिक उपचारासाठी बारामती येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान, तिचा मृत्यू झाला.
या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. मृत विवाहित तरुणी कोमल तांबे हिच्या पश्चात पती, सासू-सासरे, आई-वडील असा परिवार आहे. कोमलच्या मृत्युमुळे तरडोली व मासाळवाडी परिसरातील ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा - मोबाईल नंबरच्या आधारे ओळख, नंतर लग्नाची जबरदस्ती करत घरात घुसून धक्कादायक कृत्य
पुण्यातील एका तरुणीसोबत दुर्दैवी घटना -
सध्या राज्यात अनेक ठिकाणी पाऊस होत (Rain in Maharashtra) असल्यामुळे नद्या नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. पावसामुळे निर्सगाचे सौंदर्य खुलले आहे. (Nature in Rain) यामुळे अनेक जण पर्यटनालाही प्राधान्य देत आहेत. मात्र, यातच एक वाईट बातमी समोर आली. मैत्रिणीसोबत पर्यटनासाठी आलेली तरुणी नदी वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली.
मैत्रिणीसोबत पर्यटनासाठी आलेली तरुणी नदी वाहून गेली आहे. ही घटना मावळ-कुंडमळा परिसरातील इंद्रायणी नदीपात्रात घडली. साक्षी सतीश वंजारे, असे वाहून गेलेल्या तरुणीचे नाव आहे. पिंपरी-चिंचवडच्या आकुर्डी परिसरातून ती मैत्रिणी सोबत फिरायला आली होती. नदीपात्राच्या बाजूने फिरत असताना पाय घसरून ही तरुणी पडली आणि इंद्रायणी नदी पात्रात वाहून गेली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.