पुणे 21 ऑक्टोबर : वाघोली येथून एक अतिशय दुर्दैवी घटना समोर आली आहे. मोझे कॉलेज रस्ता इथल्या एका सोसायटीच्या चेंबरमधे 3 कर्मचारी काम करताना अडकल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पीएमआरडीए अग्निशमन जवानांनी इथे धाव घेत अडकलेल्या तिघांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यातील दोघांचा मृत्यू झाला आहे.
पुन्हा एकदा मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, मंत्री संदीपान भुमरे यांच्या मावस भावाचे अपघाती निधन
या घटनेमध्ये दोन कामगारांचा मृत्यू झाली आहे. नितीन प्रभाकर गौंड वय 45 आणि गणेश पालेकर वय 28 अशी मृतांची नावं आहेत. हे सर्व कंत्राटी कामगार असून संबंधित सोसायटीने हे चेंबर सफाईचं कंत्राट दिलं होतं. सकाळी सहा वाजता हे कामगार सफाई करताना या चेंबरमध्ये पडले. यात अडकून त्यांचा मृत्यू झाला. दोघांचे मृतदेह अग्निशमन दलाने बाहेर काढले आहेत.
पुण्यात पावसावर पेटलय राजकारण; सर्वसामान्य मात्र दुर्लक्षित!
मिळालेल्या माहितीनुसार, हे तीन कामगार चेंबर सफाई करण्यासाठी सोसायटीच्या चेंबरमधे काम करत होते. यावेळी खाली उतरल्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा झाला नाही. याच कारणामुळे यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. तर, तिसऱ्या कामगाराचा शोध अद्याप सुरू आहे. चेंबर साफ करताना या तिघांकडे कोणतीही सुरक्षा साधने नव्हती, अशी प्राथमिक माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली आहे. घटनास्थळी लोणीकंद पोलिसांचं पथकही दाखल झालं आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर दोरीचा आधार घेत दोघांना बाहेर काढलं गेलं. मात्र, या दोघांचाही मृत्यू झाला आहे. तर, चेंबरमध्ये अडकलेल्या तिसऱ्या कामगाराचा शोध सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune news, Shocking news