पुणे, 18 ऑक्टोबर : पुण्यात सोमवारी रात्री १०.३० ते १२.३० या दोन तासात सुमारे १०५ मिलीमीटर पाऊस पडला. या पावसाने शहरात सगळीकडे दाणादाण उडवून दिली. रस्त्यावरून पाण्याचे अक्षरश लोंढे वाहत होते. अनेक सोसायट्या, अनेकांच्या घरात पाणी शिरलं होतं. या पावसाने पुणेकरांचे अतोनात हाल झाले. तर दुसरीकडे राजकारण ही पेटलय. अगदी राष्ट्रवादीने भाजपच्या स्मार्ट सिटी योजनेवर जोरदार हल्ला केला आहे. तर भाजपने राष्ट्रवादी आणि काँग्रेसने बोलूच नये असं प्रत्युत्तर दिलं आहे. मनपा प्रशासनाने दीडशे वर्षात पहिल्यांदाच एवढा पाऊस झाल्याने ही परिस्थिती उद्भवल्याच सांगितल. पुण्यात पेटलय पावसावरुन राजकारण… पुण्यात काल रात्री झालेल्या पावसाने दगडूशेठ गणपती मंदिर सुध्दा पाण्यात गेलं होतं. शहरातल्या जवळपास 10 ठिकाणी घरांमध्ये सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये पाणी शिरलं होतं. काही ठिकाणी वाहने पाण्यात वाहून गेली होती. या सगळ्याची जबाबदारी कुणाची असा प्रश्न निर्माण झाल्यावर आता भाजप राष्ट्रवादीमध्ये जोरदार जुंपली आहे. भाजपवर अत्यंत संतापून अजित पवार यांनी जोरदार टीका केली आहे. भाजपने ही या पावसासाठी प्रशासनाला जबाबदार धरलं. सोबतच राष्ट्रवादी आणि काँग्रेसने 50 वर्ष जो गोंधळ घातला होता तो 5 वर्षात कसा नीट होणार, असा प्रतिप्रश्न ही राष्ट्रवादीला विचारला गेला आहे. प्रशासनाने मात्र खुलासा करताना १८८२ च्या ॲाक्टोबर महिन्यात एवढा पाऊस झाल्यानंतर आताच एवढा पाऊस झाल्याची नोंद असल्याच म्हटलं आहे. आणि पुण्यात पावसाच पाणी वाहून नेण्याची क्षमता असलेली गटारं ही ६५ मिलीमीटर इतका पाऊस वाहून नेण्याच्या क्षमतेची आहेत. त्यासाठी गेल्या १०० वर्षाच्या पावसाच्या नोंदी विचारात घेतल्या असल्याच आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे. पुण्याची मुंबई होतेय? तुफान पावसाने रस्त्यांना नदीचं स्वरुप, FC रोडवरील Video पाहिला का? राजकारण सुरूच राहील, पण पुणेकर नागरिकांना कुणी वाली उरलाय का असा प्रश्न आहे. शहरात सातत्याने तासाभराच्या पावसातही जनजीवन पूर्ण विस्कळीत होतय. सिमेंटचे रस्ते, अपुरी ड्रेनेजन्यवस्था, मेट्रोची सुरू असलेली कामं या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून पुणेकर हे भोग भोगत आहे, स्मार्ट सिटीच्या नावाखाली सगळीकडे केलेलं काँक्रिटीकरण भोवतय. त्यामुळे राजकारण करणारे राजकीय पक्ष प्रशासन पुढारी यांच्यापैकी कुणीतरी पुण्याला वाली आहे का असा प्रश्न आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.