जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पुण्याजवळ शिवशाही बसचा मध्यरात्री भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर 6 गंभीर

पुण्याजवळ शिवशाही बसचा मध्यरात्री भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर 6 गंभीर

पुण्याजवळ शिवशाही बसचा मध्यरात्री भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर 6 गंभीर

शिवशाही बस आणि कंटेनरमध्ये झालेल्या या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. घटनेत सहाजण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे. (Pune Bus Accident)

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे 19 सप्टेंबर : पुण्यापासून काही अंतरावर असलेल्या उरुळी देवाची इथे शिवशाही बसचा भीषण अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवशाही बस आणि कंटेनरमध्ये झालेल्या या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. घटनेत सहाजण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे. हा अपघात मध्यरात्री झाला असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. खारघरमध्ये शिंदे गटाचे रुपेश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल, सीसीटीव्हीत मारहाण कैद, पाहा VIDEO काल मध्यराञी साडेबारा वाजताच्या सुमारास हॉटेल सोनाईजवळ शिवशाही बस आणि कंटेनरचा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच अग्निशामक दल याठिकाणी दाखल झालं. घटनास्थळी पोहोचताच अग्निशमन अधिकारी अनिल गायकवाड यांनी नियंत्रण कक्षास कळवलं की, सदर ठिकाणी शिवशाही बस MH14 GO 3104 (पंढरपुर-स्वारगेट) व कंटेनर MH18 AA 7190 यांचा अपघात झाला आहे. दलाची मदत पोहोचण्यापूर्वी शिवशाही बसमधील 4 जखमींना नागरिकांनी बाहेर काढून जखमी अवस्थेत रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठवलं होतं. तर कंटेनर चालकालाही रुग्णालयात दाखल केलं होतं. VIDEO : मुंबई-पुणे जुन्या महामार्गार ट्रक उलटला, एकाचा मृत्यू, ट्रकखाली आणखी काहीजण असल्याची भीती दलाच्या जवानांनी पाहणी केली असता शिवशाही बसमधे ड्रायव्हर सीटमागे एक जखमी व्यक्ती अडकला होता. तात्काळ अग्निशमन उपकरण फायर एक्स वापरत पाच मिनिटात सीटवर अडकलेल्या व्यक्तीची सुटका करून त्याला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठवलं गेलं. घटनास्थळी क्रेनची मदत आली असल्याने दोन्ही अपघातग्रस्त वाहने वेळीच बाजूला केली. या अपघाताचं नेमकं कारण समजू शकलं नाही. पोलीस सध्या या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात