प्रमोद पाटील, नवी मुंबई, 18 सप्टेंबर : मुंबई-पुणे जुन्या महामार्गार एक धक्कादायक घटना घडली आहे. पोएंजे गावाजळ टँकर उलटल्याची घटना घडली. अपघातग्रस्त टँकरखाली काहीजण अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलीस आणि मदत टीम दाखल झाली आहे. बचाव पथकाकडून आतापर्यंत एक मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. टँकरखाली अजून काहीजण असल्याची भीती व्यक्त केली जातेय. बचाव पथक आणि पोलिसांकडून बचावाचं कार्य सुरु आहे.
मुंबई-पुणे जुन्या महामार्गार ट्रक उलटला, एकाचा मृत्यू, ट्रकखाली आणखी काहीजण असल्याची भीती #accident #crime pic.twitter.com/u6PJ31iuab
— News18Lokmat (@News18lokmat) September 18, 2022
( औरंगाबादेत अपहरण नाट्याचा थरार, 4 कोटींच्या खंडणीसाठी निवृत्त अधिकाऱ्याचं सिनेस्टाईल अपहरण ) दरम्यान, मुंबई-पुणे एक्स्प्रेसप्रमाणे आता मुंबई-पुणे जुना रस्ताही मृत्यूचा सापळा बनला आहे. सध्या तशीच परिस्थिती निर्माण झाली असल्याचे मागील गेल्या काही महिन्यांपासून होणाऱ्या सततच्या अपघातामुळे दिसत आहे.