• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • Babri Demolition Case: बाबरी मशीद विध्वंस हा कट नव्हता यावर विश्वास ठेवणं कठीण- माधव गोडबोले

Babri Demolition Case: बाबरी मशीद विध्वंस हा कट नव्हता यावर विश्वास ठेवणं कठीण- माधव गोडबोले

काहीही कृत्य केलं तरी सुटून जाऊ शकतो, असा मेसेज जाता कामा नये, यासाठी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं पाहिजे.

  • Share this:
पुणे, 30 सप्टेंबर: बहुप्रतिक्षित बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी (Babri Demolition Case)सीबीआयच्या विशेष न्यायालयानं महत्त्वपूर्ण निकाल दिला. या प्रकरणातील आरोपी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी यांच्यासह सर्व 32 आरोपी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. बाबरी मशीद विध्वंस पूर्वनियोजित कट नव्हता, असा निर्वाळा लखनौ कोर्टाने दिला. या प्रकरणात साक्षीदार प्रबळ नव्हते, असंही कोर्टानं निकाल देताना म्हटलं आहे. सीबीआयच्या निकालाचं भाजपकडून जोरदार स्वागत केलं जात आहे. मात्र, बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी आलेला निकाल हा अनपेक्षित, निराशाजनक आणि समर्पक नाही, असं निवृत्त गृहसचिव माधव गोडबोले यांनी मत व्यक्त केलं आहे. हेही वाचा...Babri Demolition Case: 'जय श्रीराम' असा जयघोष करत लालकृष्ण आडवाणी यांनी केलं निकालाचं स्वागत माधव गोडबोले यांनी 'News18 लोकमत'शी बाबरी मशीद विध्वंस प्रकरणाचा निकाल आल्यानंतर संवाद साधला. 500 माणसे भजन, कीर्तन करण्यासाठी जमली होती आणि ती घटना उत्स्फूर्तपणे घडली. हा कट नव्हता यावर विश्वास ठेवणं कठीण आहे, असं माधव गोडबोले यांनी यावेळी सांगितलं. या प्रकरणात साक्षीदार प्रबळ नव्हते, असंही कोर्टानं निकाल देताना म्हटलं आहे. पुरावे गोळा करता न येणं हे केवळ CBIचं अपयश नाही तर राजकीय अपयशही आहे, असा टोला देखील माधव गोडबोले म्हणाले. सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं पाहिजे... काहीही कृत्य केलं तरी सुटून जाऊ शकतो, असा मेसेज जाता कामा नये, यासाठी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं पाहिजे. जो निर्णय लागला तो तसा का लागला, याची चिकित्सा, कारणमिमांसा व्हायला हवी, असं मत माधव गोडबोले यांनी स्पष्ट केलं. माधव गोडबोले यांनी सांगितलं की, या निकालावरून अयोध्येनंतर मथुरा, काशी या ठिकाणच्या धार्मिक स्थळांबाबत चर्चा सुरू होणं म्हणजे अशांतता राहणार हे स्पष्ट आहे. या देशात 20 टक्के अहिंदू आहेत. मात्र, आपली वाटचाल हिंदू राष्ट्र होण्याकडे सुरू आहे. 15 ऑगस्ट 1947 ला देशात धार्मिक स्थळांची जी स्थिती होती ती तशीच कायम ठेवण्यात यावी, असा कायदा झाला आहे. मात्र, यात राम जन्मभूमीचा खटलाअपवाद करण्यात आला. आता हा कायदाच बदला, अशी मागणी होऊ लागली आहे. जे स्वतःला सेक्युलर फोर्स समजतात त्यांचा काय स्टँड आहे, हे कळत नाही. आपल्याला नक्की कुठल्या दिशेने जायचंय हे लोकांनीच ठरवलं पाहिजे. धर्म आणि राजकारण याची फारकत न केल्याचा हा परिणाम आहे, असंही माधव गोडबोले यांनी म्हटलं आहे. दरम्यान, 6 डिसेंबर 1992 रोजी मशीद पाडल्याबद्दल भाजप, आरएसएस, विहिंप नेते आणि कारसेवक यांच्यावरील फौजदारी खटल्याच्या या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. हेही वाचा...यूपीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कुठं आहेत रामदास आठवले? राऊतांनी फटकारलं 6 डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं? अयोध्येत 6 डिसेंबर 1992 लाखोंच्या संख्येने हिंदू कारसेवकांनी बाबरी मशिदीचा घुमट पाडला. त्यावेळी उत्तर प्रदेशात कल्याण सिंह यांचं सरकार होतं, जे सध्या राजस्थानचे राज्यपाल आहेत. देशभरातून लाखोंच्या संख्येने कारसेवक अयोध्येत दाखल झाले होते. यांमध्ये विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश होता. सकाळी साडे दहा वाजता हजारो कारसेवकांनी बाबरी मशिदीला वेढा घातला आणि घुमटापर्यंत पोहोचले. प्रत्येकाच्या मुखात त्यावेळी 'जय श्री राम'चा नारा होता.अयोध्येतील वादग्रस्त वास्तूपर्यंत पोहचलेला जमाव नियंत्रणाबाहेर गेला होता. वादग्रस्त वास्तूजवळ जवळपास दीड लाख कारसेवक जमा झाले होते. त्यामुळे वास्तूच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला. त्यावेळी अयोध्येतील परिस्थिती भयंकर झाली होती.
Published by:Sandip Parolekar
First published: