अंनिस शेख (प्रतिनिधी), देहूरोड, 27 ऑक्टोबर: शहरात सध्या गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक कमी झाल्यानं गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. शहरातील आंबेडकर नगर, शितळा नगर, थॉमस कॉलनी या भागातील टोळक्यांनी फिरणाऱ्या सराईत गुन्हेगार भरवस्तीत खुलेआम धारधार हत्यारं नाचवत आपला दबदबा निर्माण करु पाहात आहेत. त्यातच दररोज होणाऱ्या राड्यामुळे तर सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक नागरिकांनी तर आपली घरे विकून थेट गाव गाठलं आहे. हेही वाचा… 8 गावकऱ्यांना ठार मारणारा RT1 वाघ अखेर जेरबंद, लोकांनी घेतला सुटकेचा नि:श्वास पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचा पदभार नव्याने स्वीकारणारे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्यात सूचना देऊन सघंटीत गुन्हेगारी मोडून काढण्याचे आदेश दिले आहेत. तसेच नागरिकांना भयमुक्त वातावरणात राहता, यावे यासाठी पोलिसांनी सर्वतोपरीने उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु देहूरोड सारख्या शहरात पोलिस आयुक्ताच्या या आदेशाला स्थानिक पोलिस गांभीर्याने घेत नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. देहूरोड शहरातील आंबेडकर नगर भागात मध्यरात्रीच्या सुमारास शस्त्रधारी टोळक्यांकडून नागरिकांना त्रास देण्याचा प्रकार गेल्या काही दिवसांपासून वाढले आहेत. त्यासंबंधी तक्रार देऊनही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिक आता गुंडांच्या विरोधात बोलण्यास धजावत नाहीत. हप्ता न दिल्यानं महिलेसह पतीला बेदम मारहाण… थॉमस कॉलनीत मंगळवारी भयंकर प्रकार घडला. सायंकाळी सुमारास येथे सात ते आठ जणांच्या टोळक्यानं मास विक्रेत्या 35 वर्षीय महिला तसेच तिच्या पतीला हप्ता न दिल्याच्या कारणावरून वाहनाची तोडफोड करत बेदम मारहाण केली. या आधीही परिसरातील छोट्या व्यापाऱ्यांना धमकावून त्यांच्याकडून पैशाची मागणी करत मारहाणीचे प्रकार घडले आहेत. हेही वाचा… सासरे पक्ष सोडून गेले.. सूनबाईंचीही बैठकीला दांडी, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण स्थानिक पोलिसांनी संबंधित घटनेनंतर नेहमीप्रमाणे हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. परंतु शहरातील कायदा सुव्यवस्थेचा भंग करत ‘भाई’ बनू पाहणाऱ्या गुंडांवरती पोलीस कठोर कारवाई करतील का? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.