मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

आठ गावकऱ्यांना ठार मारणारा RT1 वाघ अखेर जेरबंद, नागरिकांनी घेतला सुटकेचा नि:श्वास

आठ गावकऱ्यांना ठार मारणारा RT1 वाघ अखेर जेरबंद, नागरिकांनी घेतला सुटकेचा नि:श्वास

वाघाने आठ शेतकऱ्यांना ठार केलं आहे तर दोघांना कायमचे अपंग केलं आहे.

वाघाने आठ शेतकऱ्यांना ठार केलं आहे तर दोघांना कायमचे अपंग केलं आहे.

वाघाने आठ शेतकऱ्यांना ठार केलं आहे तर दोघांना कायमचे अपंग केलं आहे.

  • Published by:  Sandip Parolekar
हैदर शेख, (प्रतिनिधी) चंद्रपूर, 27 ऑक्टोबर: राजुरा उपविभागात आठ गावकऱ्यांना ठार मारणारा RT1 वाघाला जेरबंद करण्यात अखेर वनविभागाला यश मिळालं आहे. गेल्या आठ महिन्यांपासून या नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरू होते. RT1 वाघ जेरबंद झाल्यानं राजुरा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या गावातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास घेतला आहे. विरूर येथील रेल्वे पुलाच्या खाली तयार केलेल्या कृत्रिम लोखंडी पिंजऱ्यात RT 1 वाघ मंगळवारी अडकला. पिंजऱ्यात वाघ अडकल्याचं समजताच वनविभागाच्या चमुनं धाव घेत त्याला बेशुद्ध केलं. या कामगिरीबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वनविभागाचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे. हेही वाचा...नवरात्रात घडला चमत्कार, कोरोना काळातली सगळ्यात दिलासादायक बातमी RT1 वाघाला पकडण्यासाठी वनविभागाचे गेल्या आठ महिन्यांपासून प्रयत्न सुरू होते. आतापर्यंत या वाघानं आठ नागरिकांची शिकार केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, विरूर वनपरिक्षेत्रात नरभक्षक RT1 वाघाने गेल्या वर्षभरापासून धुमाकूळ घातला होता. या वाघाने आठ शेतकऱ्यांना ठार केलं आहे तर दोघांना कायमचे अपंग केलं आहे. वाघाला गोळ्या घाला, अशी मागणी चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांच्यासह परिसरातील नागरिकांनी केली होती. दिवसरात्र सुरू होता शोध... वनविभागाने या वाघाला पकडण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. वनक्षेत्रात 150 च्या आसपास कॅमेरे बसवले होते. वन कर्मचाऱ्यांचे पथक दिवसरात्र नरभक्षक वाघाचा शोध घेत आहेत. तरी देखील वाघ जाळ्यात अडकत नव्हता. गेले वर्षभर प्रयत्न करूनही हा नरभक्षक वाघ जेरबंद करण्यात वनविभाग अपयशी ठरला होता. वन कर्मचाऱ्यांना चक्क पिंजऱ्यात बसण्याची ड्युटी दरम्यान, राजुरा परिसरातल्या नरभक्षक RT1 वाघासंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली होती. वाघाला जेरबंद करण्यासाठी दबाव वाढत असताना चक्क वन कर्मचाऱ्यांना पिंजऱ्यात बसण्याची ड्युटी लावण्यात आल्या होत्या. वाघाला बेशुद्धीचे इंजेक्शन देण्यासाठी वन कर्मचाऱ्यांना पिंजऱ्यातच दुसऱ्या टोकाला बसवलं जात असल्याचं स्पष्ट झालं होतं. यासाठी वन कर्मचाऱ्यांच्या तीन शिफ्टमध्ये ड्युटी लावण्यात आल्या होत्या. एकीकडे वाघाने आठ नागरिकांचे बळी घेतले असताना वन कर्मचाऱ्यांना प्रत्येकी आठ तास पिंजऱ्यात बसण्याची ड्युटी लावण्यात आली होती. या प्रकारामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात आलं होतं. मात्र, वन कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी या प्रकाराचा विरोध केला आहे. तर दुसऱ्या बाजूला वरिष्ठ वनाधिकार्‍यांनी वन कर्मचारी स्वतंत्र व वेगळ्या ठिकाणी असलेल्या सुरक्षित पिंजऱ्यात बसणार असल्याचे स्पष्ट केलं होतं. हेही वाचा.. मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन.. नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना यश मिळालं आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वनविभागाचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे.
First published:

Tags: Chandrapur

पुढील बातम्या