सासरे पक्ष सोडून गेल्यानंतर सूनबाईंची बैठकीला दांडी, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

सासरे पक्ष सोडून गेल्यानंतर सूनबाईंची बैठकीला दांडी, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यामुळे उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता

  • Share this:

जळगाव, 27 ऑक्टोबर: उत्तर महाराष्ट्रातील वजनदार नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. खडसेंच्या राजीनाम्यामुळे उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. हीच शक्यता गृहीत धरून जळगाव जिल्हा भाजपच्या कोअर कमिटीच्या वतीने मंगळवारी दुपारी पक्ष कार्यालयात तातडीची बैठक घेतली. मात्र, या बैठकीला एकनाथ खडसे यांची स्नुषा आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी दांडी मारली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

हेही वाचा...मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार छत्रपती संभाजी राजेंनी व्यक्त केली चिंता, म्हणाले...

भाजपकडून चाचपणी सुरू...

भाजप कोअर कमिटीच्या वतीने तातडीनं आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला प्रांत संघटक विजय पुराणीक, माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार, आमदार, महापौर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, उपाध्यक्ष आदींची उपस्थिती होती. पक्ष संघटन मजबुतीच्या दृष्टीनं वरिष्ठ नेत्यांकडून या बैठकीत चाचपणी करण्यात आली.

काय म्हणाले गिरीश महाजन?

या बैठकीनंतर माजी मंत्री गिरीश महाजन यांनी बैठकीच्या संदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, आजची कोअर कमिटीची बैठक ही नियमित स्वरूपाची होती. महाराष्ट्रात फक्त जळगाव जिल्ह्यात पक्षाची कार्यकारिणी गठीत करण्याचे काम राहिले आहे. ही कार्यकारिणी गठीत करण्यापूर्वी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या म्हणणे, त्यांचे मत जाणून घेण्यासाठी ही बैठक घेतली. त्यानंतर आता जिल्ह्यातील प्रत्येक तालुकानिहाय आढावा घेऊन कार्यकारिणी जाहीर होणार आहे. पक्षसंघटन मजबुतीसाठी चाचपणी सुरू असल्याचे यावेळी गिरीश महाजन यांनी सांगितले.

कोणतेही खिंडार पडणार नाही...

गिरीश महाजन यांनी सांगितलं की, एकनाथ खडसेंच्या पक्षांतराने भाजपमध्ये कोणतेही खिंडार पडणार नाही. कोणताही आमदार, खासदार किंवा पदाधिकारी पक्ष सोडून जाणार नाही भाजप हा विचारांवर चालणारा पक्ष असून व्यक्ती सापेक्ष पक्ष नसल्याचे गिरीश महाजन यावेळी म्हणाले.

कोअर कमिटीच्या बैठकीला खासदार रक्षा खडसे अनुपस्थित होत्या, यावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, त्या दिल्ली येथे पक्षाच्या कामानिमित्त गेल्या आहेत. त्यामुळे त्यांना बैठकीला उपस्थित राहाता आलं नाही. देवेंद्र फडणवीस यांची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली असून गेले दोन-तीन दिवस आपण त्यांच्या बरोबरच असल्याचं गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा...अजित पवार यांची चिंता पुन्हा वाढली, शिखर बँक घोटाळाप्रकरणी हायकोर्टात आव्हान

सरकार मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर नाही...

मराठा आरक्षण प्रकरणी सुप्रीम कोर्टानं पुढील चार आठवडे सुनावणी तहकूब केली आहे. सुप्रीम कोर्टात कामकाज तारीख असताना सरकारी वकील अनुपस्थित होते. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी केला आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: October 27, 2020, 7:09 PM IST

ताज्या बातम्या