औरंगाबाद, 10 जून : कोरोना व्हायरसच्या महासंकटात मंगळवारी रात्री झालेल्या दुहेरी हत्येनं औरंगाबाद हादरलं आहे. रात्री बहिण-भावाची गळा चिरुन हत्या करण्यात आल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली. बीड बायपासवरील एमआयटी चौक परिसरात ही घटना समोर आली आहे. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
सौरभ खंदाडे आणि किरण खंदाडे असं मृत युवकांची नावं आहेत. किरण पुण्याला उच्च शिक्षण घेत होती तर सौरभ दहावीत शिकत होता. दोघंही कोरोना आणि लॉकडाऊनमुळे घरीच होते. दरम्यान मंगळवारी खंदाडे दाम्पत्य घरातील कामं आवरून शेतात गेले. बहिण-भाऊ दोघंच घरी होते. खंदाडे दाम्पत्य संध्याकाळी परतल्यानंतर घरात रक्ताच्या थारोळ्यात बहिण-भाऊ रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.
हे वाचा-पिंपरी चिंचवड हादरलं, प्रेम करण्याच्या संशयावरून तरुणाची निर्घृण हत्या
हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि घराची तपासणी केली. ही हत्या सोन्यासाठी झाली असावी असा खंदाडे दाम्पत्यांनी पोलिसांना फिर्यादीमध्ये सांगितलं आहे. घरातील सोनं लंपास झाल्याचंही खंदाडे दाम्पत्याचं म्हणणं आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असून अज्ञाताविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हे वाचा-Lockdownमुळे घरी पोहोचू शकला नाही पती, रागाच्या भरात पत्नीने घेतलं विष
हे वाचा-पत्नीच्या मृत्यूनंतर अर्ध्या तासात चक्र फिरलं; रुग्णालयाजवळ आढळले पतीचे शव
संपादन- क्रांती कानेटकर